मुंबईतील सायन रुग्णालयातील धक्कादायक VIDEO, 2 रुग्णांना ठेवलं एकाच बेडवर

मुंबईतील सायन रुग्णालयातील धक्कादायक VIDEO, 2 रुग्णांना ठेवलं एकाच बेडवर

भाजप आमदार नितेश राणे यांनी सायन रुग्णालयातील परिस्थिती दाखवणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 9 मे : मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. मुंबईतील रुग्णालयातील धक्कादायक प्रकार वारंवार समोर येत आहेत. त्यातच मुंबईतील सायन रुग्णालयातील एक गंभीर बाब उघड झाली आहे. सायन रुग्णालयातील अपघात विभागात एका बेडवर दोन रुग्ण ठेवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढल्याने एकाच बेडवर 2 रुग्ण ठेवण्यात येत आहेत.

हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर रुग्णालयाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. अपघात विभागात बेडची संख्या मर्यादित असल्याचं रुग्णालयाचा म्हणणं आहे. मात्र याआधीही अशाच पद्धतीने काम होत असलं तरी कोरोनाच्या काळात हे धोकादायक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता याप्रकरणी काही कारवाई होते का, हे पाहावं लागेल.

‘हे रुग्णालय आहे की स्मशानभूमी. मुंबईकरांना अशी वागणूक का दिली जात आहे? हे थांबलं पाहिजे,’ असं ट्वीट करत भाजप आमदार नितेश राणे यांनी सायन रुग्णालयातील परिस्थिती दाखवणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

मुंबईतील रुग्णालयाचे अधिष्ठाता बदलले

सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता प्रमोद इंगळे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डॉक्टर रमेश भरमाल हे आता नवे अधिष्ठाता असतील. तसंच नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून आता डॉक्टर मोहन जोशी काम पाहतील. सायन रुग्णालयातील एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या प्रकरणामुळे हे बदल करण्यात आल्याची चर्चा आहे.

मुंबई महापालिकेतही मोठे बदल

मुंबईत कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी इक्बाल सिंग चहल यांच्याकडे आयुक्तपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. इक्बाल सिंग चहल यांनी आज सकाळी मुंबई सेंट्रल स्थित नायर रुग्णालयात भेट देऊन covid-19 उपचार सेवा सुविधांची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री सुरेश काकानी, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, डॉ. गौतम भंसाली व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी अतिदक्षता विभागासह विविध ठिकाणी भेट दिली.

First published: May 9, 2020, 4:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या