वादाचे रूपांतर भांडणात, 3-4 जणांनी सहप्रवाशाला धावत्या लोकलमधून फेकले

वादाचे रूपांतर भांडणात, 3-4 जणांनी सहप्रवाशाला धावत्या लोकलमधून फेकले

हार्बर लोकल मार्गावरील टिळक नगर आणि कुर्ला रेल्वे स्टेशनजवळ गुरूवारी सकाळी 10 वाजता ही घटना घडली

  • Share this:

मुंबई,5 डिसेंबर:धावत्या लोकलमधून सहप्रवाशाला 3-4 जणांच्या टोळक्याने बाहेर फेकल्याची घटना समोर आली आहे. हार्बर लोकल मार्गावरील टिळक नगर आणि कुर्ला रेल्वे स्टेशनजवळ गुरूवारी सकाळी 10 वाजता ही घटना घडली आहे. विजयकुमार राममिलन गुप्ता (वय-35, रा. मानखुर्द) असे या प्रवाशाचे नाव असून त्याच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. विजयकुमार यांच्या उजव्या हाताचे हाड मोडले आहे. विजयकुमारला हात गमवावा लागण्याची शक्यता आहे.

मिळालेली माहिती अशी की, विजयकुमार गुप्ता यांनी मानखुर्द स्टेशनवरून सकाळी 9 च्या सुमारास सीएसएमटीला जाणारी लोकल पकडली. लोकलला गर्दी असल्याने बऱ्याच प्रयत्नानंतर विजयकुमार यांनी आत प्रवेश केला. कुर्ला स्टेशन येण्यापूर्वी अनेक प्रवासी उतरण्याच्या तयारीत होते. यावेळी विजयकुमार आणि डब्यातील चार ते पाच जणांच्या टोळक्यासोबत बसण्याच्या जागेवरून वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यातच 3-4 जणांनी विजय गुप्ता यांना धावत्या लोकलमधून बाहेर फेकले. सुदैवाने विजयकुमार हे खडीवर पडले. त्यामुळे ते थोडक्यात बचावले. त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या दुर्घटनेमुळे विजय गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गर्दीत धक्का लागल्यामुळे भांडण झाल्याची प्राथमिक शक्यता रेल्वे पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांनी अज्ञात प्रवाशाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, मुंबई लोकल म्हटले की, पहिल्यांदा डोळ्यासमोर लोकलमधील गर्दी येते. या गर्दीमुळेच लोकलमध्ये अनेक घटना घडत असतात. बसण्याच्या वादातून एका टोळक्मयाने एका प्रवाशाला लोकलमधून बाहेर फेकले.

धावत्या लोकलमधून तरुणीने मारली उडी..

'लोकलमधून धूर येतोय'… अशा अफवेला घाबरून एका तरुणीने धावत्या लोकलमधून उडी मारल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. सुदैवाने ती जीव थोडक्यात बचावली. अनिशा खेमाने (वय-20) तरुणीचे नाव आहे. धावत्या लोकलमधून उडी मारल्यामुळे अनिशाच्या हनुवटीला जखम झाली आहे. सध्या अनिशावर घाटकोपर येथील पांचोली रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अनिशाने कल्याणला जाणारी लोकल पकडली. लोकल माटुंगा स्थानकातून निघत असतानाच अचानक मोठा आवाज झाला. यावेळी लोकल डब्यातून काही तरी जळाल्याचा वास आला. यावेळी डब्यात देखील धावा... पळा... लोकलमधून धूर येतोय, लोकलला आग लागली असा गोंधळ सुरू झाला. गोंधळामुळे घाबरून अनिशाने फलाटावर उडी मारली. यामुळे तिच्या चेहऱ्यावर दुखापत झाली असून हनुवटीवर सात टाके घालावे लागले आहेत, अशी माहिती अनिशाच्या आत्याने दिली आहे.

First published: December 5, 2019, 9:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading