Home /News /mumbai /

VIDEO : धावती लोकल पकडताना प्रवाशाचा गेला तोल, वसई रेल्वे स्थानकातील घटना 

VIDEO : धावती लोकल पकडताना प्रवाशाचा गेला तोल, वसई रेल्वे स्थानकातील घटना 

वसई रेल्वे स्थानकात धावती ट्रेन पकडण्याचा मोह एका प्रवाशाच्या जीवावर बेतता-बेतता राहिला. वसई रेल्वे स्थानकात धावती लोकल पकडताना एका प्रवाशाचा तोल गेला आणि तो लोकल ट्रेन व प्लॅटफॉम मधल्या अंतरात अडकला गेला.

    विजय देसाई, प्रतिनिधी वसई, 27 जानेवारी : पश्चिम रेल्वे मार्गावरील (Western Railway) वसई रेल्वे स्थानकावर (Vasai Railway Station) मंगळवारी (25 जानेवारी) एक अनपेक्षित घटना घडली. धावती लोकल ट्रेन (local train) पकडणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडण्याची शक्यता होती. संबंधित व्यक्ती ही धावती ट्रेन पकडत होती. यावेळी त्याचा तोल गेला. त्यामुळे फलाट आणि रेल्वे गाडी यांच्यात असणाऱ्या अंतरात त्याचा पाय निसटला. पण सुदैवाने रेल्वे स्थानकावर कार्यावर असलेल्या रेल्वे पोलिसांनी या व्यक्तीचा जीव वाचवला. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत. नेमकं काय घडलं? वसई रेल्वे स्थानकात धावती ट्रेन पकडण्याचा मोह एका प्रवाशाच्या जीवावर बेतता-बेतता राहिला. वसई रेल्वे स्थानकात धावती लोकल पकडताना एका प्रवाशाचा तोल गेला आणि तो लोकल ट्रेन व प्लॅटफॉम मधल्या अंतरात अडकला गेला. सुदैवाने इतक्यात कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून अडकलेल्या प्रवाशाला बाहेर खेचले. सुभाष तामोरे असं या प्रवाशाचे नाव आहे. या अपघातात त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे स्थानकात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा जीवन-मृत्यूचा थरार चित्रित झाला आहे. ट्रेन पकडताना होणारे असे अपघात दिवसेंदिवस वाढतच असल्याने नागरिकांनी आपला मोलाचा असलेला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. (रोहित-धवनपेक्षाही आक्रमक तरी संधी नाही, 22 व्या वर्षीच खेळाडूचं करियर संकटात!) पनवेल रेल्वे स्थानकावरही असाच प्रकार विशेष म्हणजे गेल्या महिन्यात नवी मुंबईतील पनवेल रेल्वे स्थानकावरही असाच प्रकार घडला होता. पनवेल रेल्वे स्थानकाहून लखनऊला जाणाऱ्या ट्रेनमध्ये कामोठे येथे राहणारी महिला आपल्या मुलासोबत ट्रेनमध्ये चढत होती. त्याची सीट आरक्षित होती. वेळवर न पोहोचल्याने फलटावरुन ट्रेन सुटली होती. यावेळी संबंधित महिला घाईत ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. ट्रेनचा वेग वाढण्यापूर्वी त्या महिलेला ट्रेनमध्ये चढता आलं नाही. त्यातच तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. यावेळी रेल्वे पोलीस काडूराम मीणा यांनी धावत जावून त्या महिलेला खेचून संकटातून बाहेर काढलं. काडूराम वेळेवर पोहोचले नसते तर कदाचित ती महिला फलाटावरुन पडून रेल्वेरुळावर खेचली गेली असती.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या