राज्य कृषी मुल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतमालाचे हमी भाव ठरवण्यासाठी 23 एप्रिलला राज्य कृषी मुल्य आयोगाची स्थापना केली होती.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2017 07:09 PM IST

राज्य कृषी मुल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल

02 जुलै :  राज्य कृषी मुल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती करण्यात आलीये.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतमालाचे हमी भाव ठरवण्यासाठी 23 एप्रिलला राज्य कृषी मुल्य आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती करण्यात आलीये.

पाशा पटेल हे शेतकरी चळवळीतले नेते आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न माहिती आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव ठरवताना त्यांच्या पदरात चांगलं काहीतरी पडेल अशी अपेक्षा निर्माण झालीये. पाशा पटेल यांची नियुक्ती होणार अशी बातमी आयबीएन लोकमतनं काही दिवसांपूर्वी दाखवली होती. त्या वृत्तावर आज शिक्कामोर्तब झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2017 07:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...