राज्य कृषिमूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल ?

राज्य कृषिमूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल ?

"1 जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधून सरकारकडून पाशा पटेल यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे"

  • Share this:

24 जून : राज्य कृषिमूल्य आयोगाला लवकरच मिळणार अध्यक्ष मिळणार आहे.  भाजपचे माजी आमदार पाशा पटेल यांची अध्यक्षपदीवर्णी लागण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधून सरकारकडून पाशा पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. 23 एप्रिल 2015 रोजी सरकारने राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली होती. 2 जून रोजी शेतकऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत 2 महिन्याच्या आत कृषी मूल्य आयोगाला अध्यक्ष नेमून आयोगचे काम सुरू करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते.

या आयोगात 4 ही कृषी विद्यापीठ यांच्या कुलगुरू यांचा समावेश असतो. तसंच राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे कृषी आयुक्त यांचा समावेश यात असतो.

First published: June 24, 2017, 2:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading