मुंबई आणि पुणेकरांनो, उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी विचार करा!

मुंबई आणि पुणेकरांनो, उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी विचार करा!

उद्यापासून ट्रेन, बस, मेट्रो आणि एसटीसुद्धा 50 टक्के प्रवासी क्षमतेनंच चालवण्यात येतील. उभं राहून प्रवास करू दिला जाणार नाही.

  • Share this:

मुंबई, 18 मार्च : पुण्यात गेले दोन दिवस दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीनं व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे एरवी गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. आता मुंबईतही उद्यापासून अंशतः दुकानं बंद राहतील, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. गर्दी टाळण्यासाठी टप्प्या-टप्प्याने ठराविक भागातली दुकानं उघडी राहतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. मुंबईकरांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, कारण उद्यापासून ट्रेन, बस, मेट्रो आणि एसटीसुद्धा 50 टक्के क्षमतेनंच चालवण्यात येतील. त्यामुळे गरज असल्याशिवाय बाहेर पडणं टाळलेलं बरं.

बसमध्ये आणि मेट्रोमध्ये उभं राहून प्रवास करू दिला जाणार नाही. सहप्रवाशांपासून सुरक्षित अंतर ठेवूनच बसमध्ये बसावं लागणार आहे. त्यामुळे वेळेवर बस मिळण्यासाठी ताटकळावं लागू शकतं. पुण्यातही बससेवा निम्म्या क्षमतेनं चालवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रवासी संख्या रोडावली

मुंबईत पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्या आज 27 टक्क्यांनी कमी झालेली होती. तर मेट्रोनं प्रवास करणारे 40 टक्क्यांनी कमी झालेले होते. सेंट्रल रेल्वेने आज त्यांच्या हद्दीत रस्त्यावर किंवा ट्रेनमध्ये थुंकणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली. त्यातून त्यांनी 30000 रुपयांचा दंड वसूल केला. एसटी वाहतूकही आज निम्म्याने घटल्याचं सांगण्यात आलं.

संबंधित - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ST मध्ये ‘सुरक्षित अंतर योजना’, आसन व्यवस्थेत केले बदल

सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थिती नसावी, असं शासनातर्फे सांगण्यात आलं आहे. घरून काम करणं शक्य नसेल तर कर्मचाऱ्यांना एक दिवसाआड सुटी द्यावी लागणार आहे. एसटीनेसुद्धा परिपत्रक जारी केलं असून शेजारील सीट रिकामी ठेवूनच प्रवास करावा लागणार आहे. क्षमतेच्या निम्मे प्रवासी घेऊन आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर बसूनच एसटीचा प्रवास करता येणार आहे.

कोरोनाला रोखण्यााठी सरकारने केले मोठे बदल

1. राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज 50 टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरु ठेवण्यात येतील.

2. रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

3. मुंबईमध्ये बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद करण्यात येतील. तसेच प्रवाशी अंतराने बसावेत यासाठी तशा सूचना प्रवाशांना देण्यात येतील.

संबंधित - कोरोनाला हरवण्यासाठी महाराष्ट्र सज्ज, आरोग्यमंत्र्यांनी केल्या 5 मोठ्या घोषणा

शहरांमध्ये बसेसची संख्या वाढविण्यासाठी पर्यायी बसेसची व्यवस्था करण्यात येईल.

4. दुकानांच्या वेळा ठरविणार

शहरातील दुकानांच्या वेळा अशा तऱ्हेने ठरविण्यात येतील की, सर्व दुकाने अंतरा-अंतराने सकाळी व दुपारी सुरू होतील. बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये बदल करण्यात येईल.

5. साधनसामुग्रीची उपलब्धता

दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची साधनसामुग्री उपलब्ध राहील हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आवश्यक तेवढ्या अलगीकरण कक्ष व विलगीकरण कक्षांची सोय करण्यात आली आहे. आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेशन, मास्क तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने, औषध सामुग्री देखील उपलब्ध आहेत.

कोरोनामुळे मुंबई अंशत: लॉकडाऊन होणार , ठाकरे सरकारने अखेर केले 5 बदल

First published: March 18, 2020, 9:10 PM IST

ताज्या बातम्या