मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

नातवाने रात्रीच घेतली होती शरद पवारांची भेट, सुप्रिया सुळे म्हणाल्या, Chilling with पार्थ!

नातवाने रात्रीच घेतली होती शरद पवारांची भेट, सुप्रिया सुळे म्हणाल्या, Chilling with पार्थ!

पार्थ यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर आजोबांनी अतिशय कडक शब्दात प्रतिक्रिया दिल्याने तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

पार्थ यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर आजोबांनी अतिशय कडक शब्दात प्रतिक्रिया दिल्याने तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

पार्थ यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर आजोबांनी अतिशय कडक शब्दात प्रतिक्रिया दिल्याने तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

मुंबई 12 ऑगस्ट: अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी नातू पार्थला आज चांगलच फटकारलं. त्यानंतर चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. बुधवारी सकाळी पवारांनी नातवला खडे बोल सुनावले त्या आधी म्हणजे मंगळवारच्या रात्रीच पार्थ यांनी शरद पवारांची भेट घेतली होती अशी माहितीही समोर आली आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पार्थ यांच्यासोबतचा एक फोटोही इन्स्टाग्रामवर टाकत Chilling with पार्थ अशी कमेंट केली होती. या भेटीत पार्थ यांनी राम मंदिर आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर आपली बाजू पवारांपुढे मांडली होती. पार्थ यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर आजोबांनी अतिशय कडक शब्दात प्रतिक्रिया दिल्याने तर्क वितर्कांना उधाण आले आहे. आज काय घडलं? अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. आपल्या नातावाने केलेल्या या मागणीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'माझ्या नातवाच्या मागणीला मी कवडीची किंमत देत नाही, तो अपरिपक्वव आहे' अशा शब्दांत शरद पवार यांनी पार्थ पवार यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. MPSC: राज्यसेवा पूर्व परिक्षेची नवी तारीख जाहीर, विद्यार्थ्यांनो तयार राहा! तसंच 'सुशांत प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे देण्याची कोणतीही गरज नाही. मुंबई पोलिसांना मी गेल्या 50  वर्षांपासून ओळखतो. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
View this post on Instagram

Chilling With Parth! 🙂 @parthajitpawar

A post shared by Supriya Sule (@supriyasule) on

'सुशांतसिंग प्रकरणाची चर्चा करण्याचे कारण नाही. त्यामुळं कुणी काय आरोप केले यात मी खोलात जाणार नाही. माझ्या दृष्टीनं हा विषय तितका महत्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली तर नक्कीच दु:ख होते. परंतु, त्याची चर्चा ज्या पद्धतीने होत आहे. त्याचे मला आश्चर्य वाटते.' असंही पवार म्हणाले. आजोबा शरद पवारांच्या वक्तव्यावर पार्थ यांची पहिली प्रतिक्रिया... त्याचबरोबर, 'सातारा जिल्ह्यात एका शेतकऱ्यांने मला विचारलेही याबद्दल. त्यालाही याबद्दल आश्चर्य वाटते. 20 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी त्याची नोंद घेतली जात नाही' असंही पवार म्हणाले.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Parth pawar, Sharad pawar, Supriya sule

पुढील बातम्या