BREAKING:पार्थ पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, नाराजी व्यक्त केल्यानंतर पहिलीच चर्चा

BREAKING:पार्थ पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, नाराजी व्यक्त केल्यानंतर पहिलीच चर्चा

पार्थ हे नाराज असल्याच्या बातम्याही दिवसभर येत होत्या त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

  • Share this:

मुंबई 13 ऑगस्ट:  दिवसभराच्या चर्चेनंतर पार्थ पवार यांनी रात्री शरद पवारांची भेट घेतली. सिल्व्हर ओक या पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी ही भेट झाली. मंगळवारी पवारांनी अतिशय कडक भाषेत समज दिल्यानंतर पहिल्यांदाच पार्थ हे शरद पवारांची भेट घेत आहेत. पार्थ हे नाराज असल्याच्या बातम्याही दिवसभर येत होत्या त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ही भेट म्हणजे नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असल्याचंही बोललं जातं आहे.

या बैठकीला अजित पवारही येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पार्थ पवार यांच्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानानंतर पार्थ पवार कमालीचे अस्वस्थ असून काही मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. असा दावा पार्थ पवार समर्थकांकडून केला जातोय. सध्याची राजकीय स्थिती बघता निर्णय घेण्याची ही योग्य योग्य वेळ असल्याचं देखील बोललं जातं आहे. शरद पवारांनी जाहीरपणे फटकारल्यानंतर पार्थ यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्याचं त्यांच्या समर्थकांना वाटतं.

बैलगाडा शर्यतबंदी उठण्यावर महत्त्वाची बैठक, काय म्हणाले अमोल कोल्हे

राष्ट्रवादीकडून लकसभा निवडणूक लढलेल्या आणि निवड समितीत काम केलेल्या युवा नेत्याला अपरीपक्व म्हटल्यामुळे पार्थ नाराज असल्याची माहिती समर्थकांकडून दिली जात आहे.

अजित पवारांन मोठ्या आत्मविश्वासाने पार्थ यांना लोकसभा निवडणुकीच्या काळात लाँच केलं होतं. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्यानंतरही राष्ट्रवादीत वादळ निर्माण झालं होतं. विधानसभा निवडणकीनंतर अजित पवारांनी बंड केलं होतं. त्यामुळे पार्थ पवार कुठला निर्णय घेतात याकडे आता राजकीय निरिक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 13, 2020, 7:44 PM IST

ताज्या बातम्या