BIG NEWS: राष्ट्रवादीत भूकंपाची शक्यता, पार्थ पवार घेणार मोठा निर्णय?

BIG NEWS: राष्ट्रवादीत भूकंपाची शक्यता, पार्थ पवार घेणार मोठा निर्णय?

सध्याची राजकीय स्थिती बघता निर्णय घेण्याची ही योग्य योग्य वेळ असल्याचं देखील त्यांच्या समर्थकांना वाटतं.

  • Share this:

मुंबई 13 ऑगस्ट: पार्थ पवार यांच्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानानंतर पार्थ पवार कमालीचे अस्वस्थ असून काही मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. असा दावा पार्थ पवार समर्थकांकडून केला जातोय. सध्याची राजकीय स्थिती बघता निर्णय घेण्याची ही योग्य योग्य वेळ असल्याचं देखील बोललं जातं आहे. शरद पवारांनी जाहीरपणे फटकारल्यानंतर पार्थ यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्याचं त्यांच्या समर्थकांना वाटतं.

राष्ट्रवादीकडून लकसभा निवडणूक लढलेल्या आणि निवड समितीत काम केलेल्या युवा नेत्याला अपरीपक्व म्हटल्यामुळे पार्थ नाराज असल्याची माहिती समर्थकांकडून दिली जात आहे.

अजित पवारांन मोठ्या आत्मविश्वासाने पार्थ यांना लोकसभा निवडणुकीच्या काळात लाँच केलं होतं. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्यानंतरही राष्ट्रवादीत वादळ निर्माण झालं होतं. विधानसभा निवडणकीनंतर अजित पवारांनी बंड केलं होतं. त्यामुळे पार्थ पवार कुठला निर्णय घेतात याकडे आता राजकीय निरिक्षकांचं लक्ष लागलं आहे.

जयंत पाटील काय म्हणाले?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ यांना जाहीरपणे फटकारल्यानंतर राष्ट्रवादीत खळबळ उडाली होती. त्यानंतर अजित पवार आणि पार्थ हे नाराज असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. अजित पवार किंवा पार्थ पवार हे नाराज नाहीत त्यामुळे मानण्याचा प्रश्नच नाही अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

पायलट परतले तरी धोका कायम, भाजपच्या 'अविश्वासा'मुळे काँग्रेसचा जीव टांगणीला

ते म्हणाले, पार्थ पवार कुठला निर्णय घेणार नाहीत. कुणीही नाराज होण्याचा प्रश्नच नाही. घरवापसीच्या मुद्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायला अनेक नेते इच्छुक आहेत. पण सर्व बाबी विचारात घेऊन निर्णय घेणार आहोत. याबाबत बोलणी सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं.

नवनीत राणा यांना श्वास घ्यायला होतोय त्रास, तातडीने मुंबईला हलवलं

'पार्थ अपरिपक्व आहे. त्याच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही,' असं म्हणत शरद पवार यांनी पार्थ यांना फटकारलं. शऱद पवार यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सर्वांचे डोळे विस्फारले. मात्र त्यानंतर भाजप नेत्यांनी पार्थ पवार यांना समर्थन द्यायला सुरुवात केली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 13, 2020, 6:00 PM IST

ताज्या बातम्या