Home /News /mumbai /

CM उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर खासदार जाधवांची तलवार म्यान; म्हणे, राजीनामाच दिला नाही

CM उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर खासदार जाधवांची तलवार म्यान; म्हणे, राजीनामाच दिला नाही

'ज्या मतदार संघात ज्या पक्षाचे आमदार खासदार आहेत त्या प्रमाणे कामाचं सूत्र ठरलेलं आहे. संजय जाधव यांनी राजीनामा दिलेलाच नाही त्यामुळे मागे घेण्याचा विषयच नाही.'

मुंबई 27 ऑगस्ट: राष्ट्रवादीवर आरोप करत शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी बुधवारी राजीनामा दिला होता. त्यानंतर चक्र फिरले आणि नाराज संजय जाधव यांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेही उपस्थित होते. या भेटीनंतर शिंदे यांनी जाधव हे नाराज नाहीत आणि त्यांनी राजीनामाही दिलेला नाही असं सांगत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. जाधव यांनी बुधवारी आपल्या लेटरहेडवर राजीनामा पत्र लिहून ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलं होतं. त्यात त्यांनी नाराजीचं कारण देत राष्ट्रवादीवर आरोपही केले होते. शिंदे म्हणाले, खासदार संजय जाधव मुख्यमंत्री साहेबांना भेटलेत. त्यांची कोणतीही नाराजी नाही. त्यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यांच्या मतदारसंघातील जी कामं होती ती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिली आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी नाही. संजय जाधव यांनी कोणतीही नाराजी दर्शवलेली नाही. संजय जाधव यांच्या मतदारसंघातील कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी संबधित अधिकाऱ्यांनाही सांगितले आहे. ज्या मतदार संघात ज्या पक्षाचे आमदार खासदार आहेत त्या प्रमाणे कामाचं सूत्र ठरलेलं आहे. संजय जाधव यांनी राजीनामा दिलेलाच नाही त्यामुळे मागे घेण्याचा विषयच नाही. काय आहे राजीनामा प्रकरण? सत्तेत असुनही काम होत नाहीत, त्यामुळे खासदारकी काय कामाची. फक्त राष्ट्रवादीचीच कामे होतात असा आरोप करत शिवसेनेच्या खासदाराने बुधवारी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राजीनाम्याचं पत्र मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे. त्यात त्यांनी राजीनाम्याचं कारण सविस्तर सांगितलं आहे. त्यांचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी अद्याप स्वीकारलेला नाही. राष्ट्रवादीच्या परभणी कार्यालयावर दगडफेक, सेना खासदाराच्या राजीनाम्यानंतरची घटना जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचं अशासकीय मंडळ नियुक्त करण्यासाठी पाठपुरावा करूनही काहीही झालं नाही. त्यामुळे राजीनामा दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सरकारमध्ये असूनही काम होत नाही या अस्वस्थेतून बंडु जाधव यांनी हा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम होत नसल्याची शिवसैनिकांची भावना आहे. राष्ट्रवादीवर आरोप करत शिवसेनेच्या खासदाराचा राजीनामा, उद्धव ठाकरेंना दिलं पत्र राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेचा पुरेपूर वापर करत आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि कार्यकर्त्यांना ताकद देत आहे. असंही त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Uddhav thackeray

पुढील बातम्या