मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

...आणि परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले 50 हजार!

...आणि परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले 50 हजार!

त्यामुळे परमबीर सिंग यांना चौकशीला हजर राहावे लागणार आहे, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

त्यामुळे परमबीर सिंग यांना चौकशीला हजर राहावे लागणार आहे, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

त्यामुळे परमबीर सिंग यांना चौकशीला हजर राहावे लागणार आहे, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 31 ऑगस्ट : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (parambir singh)  यांनी लेटर बॉम्ब टाकून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना घरचा रास्ता दाखवला. पण, आता परमबीर सिंग सुद्धा अडचणीत सापडले आहे. कोर्टाच्या आदेशानंतर आज त्यांनी मुख्यमंत्री कोविड सहायत्ता निधीमध्ये (cm covid relief fund) 50 हजार जमा केले आहे.

परमबीर सिंग यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहे. या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. त्यांचे वकील अनुकूल सेठ यांनी दिलेल्या माहितीनुसार,  परमबीर सिंग हे राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीसमोर हजर झाले नव्हते. त्यामुळे त्यांना 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. या दंडाची रक्कम त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यास सांगितले होते. त्यानंतर सिंग यांनी आज हा निधी जमा केला आहे, असं वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिलं आहे.

'त्याच्याशिवाय जगणं मुश्किल', सर्वात प्रिय व्यक्ती दूर गेल्याने मलायका भावुक

परमबीर सिंग यांनी सचिन वाझे मार्फत अनिल देशमुख यांनी 100 कोटी वसुली करण्याचे सांगितले होते, असा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणाची चौकशीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती के. चांदिवाल यांची चौकशी समिती स्थापन केली होती. पण परमबीर सिंग एकदाही हजर राहिली नाही त्यामुळे त्यांना हा दंड ठोठावला होता.

अमेरिकेत डेल्टा व्हायरसचा प्रकोप; बेड, स्टाफ आणि ऑक्सिजनची कमतरता

परमबीर सिंग जून महिन्यात चौकशीला हजर न राहिल्यामुळे त्यांना 5 हजार कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतरही तो दंड त्यांनी भरला नाही. पुढील सुनावणीसाठी सुद्धा परमबीर सिंग हजर झाले नाही. त्यामुळे दंडाची रक्कम 25 हजार करण्यात आली. त्यानंतर हा दंड 50 हजार रुपये करण्यात आला.

त्याचबरोबर परमबीर सिंग यांच्याविरोधात चौकशीला मुंबई हायकोर्टात आवाहन देण्यात आले आहे. याबद्दल याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे चौकशी आयोगाने 7 सप्टेंबरपर्यंत सुनावणीला स्थगिती दिली आहे. त्याचवेळी 7 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांना चौकशीला हजर राहावे लागणार आहे, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

First published: