Home /News /mumbai /

माजी गृहमंत्र्यांच्या दोन्ही सचिवांची CBI ने केली चौकशी, धक्कादायक माहिती समोर

माजी गृहमंत्र्यांच्या दोन्ही सचिवांची CBI ने केली चौकशी, धक्कादायक माहिती समोर

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे हे दोन्ही सचिव मुंबई पोलीस दलातील पोलीस उपायुक्त राजू भुजबळ, एसीपी संजय पाटील आणि एपीआय सचिन वाझे या तिघांना वारंवार भेटायचे.

मुंबई, 11 एप्रिल : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (parambir singh) यांनी पत्र लिहून केलेल्या आरोपांमुळे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू असून अनिल देशमुख यांच्या दोन माजी खासगी सचिवांची सीबीआयने चौकशी केली. परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब टाकल्यांनतर त्याची झळ आता थेट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना बसत असून मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशनुसार सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. सीबीआयने आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे दोन पीएंना चौकशी करता बोलावले आहे. Pandharpur by-election : अजितदादांपाठोपाठ रोहित पवारांचीही सभा हाऊसफुल्ल, VIDEO असं सांगितलं जातंय की, अनिल देशमुख यांचे हे दोन्ही सचिव मुंबई पोलीस दलातील पोलीस उपायुक्त राजू भुजबळ, एसीपी संजय पाटील आणि एपीआय सचिन वाझे या तिघांना वारंवार भेटायचे. एवढंच नाही तर बार, हुक्का पार्लर सारख्या आस्थपनांकडून पैसे गोळ्या करण्या संदर्भात या दोन्ही सचिवांनी या तिन्ही पोलिसांशी अनेकदा चर्चा केली. त्यामुळे नेमके अनिल देशमुख यांचे पीए या पोलिसांना वारंवार का भेटायचे? तसंच यांच्यात काय चर्चा होत होती? माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानुसार तसंच सचिन वाझेंच्या लेटर बॉम्बमध्ये असलेल्या उल्लेखानुसार, या सचिवांनी नेमकी काय भुमिका बजावली, याची शाहनिशा सीबीआय या दोघांकडून करत आहे. ‘ऑस्कर' स्विकारताना होती ही चिंता’; ए. आर.रेहमान यांनी सांगितला किस्सा सीबीआयने आतापर्यंत तक्रारदार जयश्री पाटील, प्रतिवादी परमबीर सिंग, एसीपी संजय पाटील, सचिन वाझे, आणि हॉ़टेल व्यावसायिक महेश शेट्टी यांची चौकशी केली. तर आज सीबीआयने अनिल देशमुख यांच्या दोन सचिवांची चौकशी केल्याने पुढचा नंबर अनिल देशमुख यांचा लागतो का? या चर्चेने आता जोर धरला आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:sachin Salve
First published:

Tags: CBI, सीबीआय

पुढील बातम्या