Home /News /mumbai /

BREAKING : परमबीर सिंग पत्राची ठाकरे सरकारने घेतली दखल, चौकशी समितीची घोषणा करण्याची शक्यता

BREAKING : परमबीर सिंग पत्राची ठाकरे सरकारने घेतली दखल, चौकशी समितीची घोषणा करण्याची शक्यता

येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक बोलावली आहे.

  मुंबई, 23 मार्च : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांच्या लेटर बॉम्बनंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख  (Anil Deshmukh) अडचणीत सापडले आहेत. एवढंच नाहीतर परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात सुद्धा याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची राज्य सरकारने एका निवृत्त न्यायाधिशांच्या चौकशी समितीच्या मार्फत (Committee of Inquiry of Retired Judges) चौकशी करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परमबीर सिंग यांनी पत्रात केलेल्या गंभीर आरोपांची राज्य सरकारने दखल घेतली आहे.  राज्य सरकार आता एक निवृत्त न्यायाधिशांची चौकशी समिती बनवून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे.  परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकार या समितीवर हायकोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश नेमण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारमधील विश्वसनिय सूत्रांनी असेही सूचित केले आहे की, सध्यातरी गृहमंत्री अनिल देशमुख आपल्या पदावरून हटणार नाहीत. येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक बोलावली आहे.  त्यावेळी महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. येत्या गुरुवारी परमबीर सिंग यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात येईल. त्याच दिवशी समन्वय समितीची बैठक होऊन महत्वाचा निर्णय घोषित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनिल देशमुख यांच्या विमानप्रवासाचे पत्र आले समोर दरम्यान, परमबीर सिंग यांनी पत्रात उल्लेख केलेल्या सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही असं म्हणत देशमुखांचा राजीनामा घेणार नाही', असं स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे भाजपने अनिल देशमुख यांची भेट झालीच होती, असा दावा केला आहे.

  मुलीनंच वडिलांना जिवंत जाळलं; घटना CCTV मध्ये कैद, का उचललं टोकाचं पाऊल?

  दरम्यान, गृहमंत्र्यांना कोरोना (Coronavirus) झाल्यानंतर ते गृह विलीगिकरणात होते असा दावा शरद पवार यांनी केला होता. त्यामुळे वाझे भेट कशी शक्य होती? असा सवालही पवारांनी विचारला होता. दरम्यान आता नागपूरवरून स्पेशल चार्टर विमानाने गृहमंत्री अनिल देशमुख मुंबईस आल्याचे तिकीट समोर आल्याने अजून एक नवीन ट्वीस्ट निर्माण झाला आहे. मात्र, अनिल देशमुखांनी एक व्हिडीओ ट्वीट करत फेब्रुवारी महिन्यात काय काय घडले याचा एक घटनाक्रमच सांगितला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, 04 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान ते नागपूरच्या रुग्णालयामध्ये भरती होते. त्यांनंतर 15 फेब्रुवारी रोजी मुंबईला जाण्यासाठी विमानप्रवास केला. त्यानंतर ते त्यांच्या मुंबईतील सरकारी निवासस्थानी क्वारंटाइन होते असल्याचा दावा अनिल देशमुखांनी केला आहे.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Anil deshmukh, Coronavirus, Paramvir sing, Uddhav thackeray, अनिल देशमुख, उद्धव ठाकरे

  पुढील बातम्या