Home /News /mumbai /

परमबीर सिंग यांच्यावर नवा आरोप, क्रिकेट सट्टेबाजनं नोंदवला जबाब

परमबीर सिंग यांच्यावर नवा आरोप, क्रिकेट सट्टेबाजनं नोंदवला जबाब

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग (Param Bir Singh)यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय.

    मुंबई, 26 मे: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. दोन दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळाल्यानंतर आज पुन्हा परमबीर सिंग यांच्यावर नवा आरोप करण्यात आला आहे. क्रिकेट सट्टेबाज सोनू जालान यानं हे आरोप केलेत. सोनूनं स्वतः गुन्हे अन्वेषण विभाग (CID) कडे जाऊन आपला जबाब नोंदवला आहे. यासंदर्भात मंगळवारी ही माहिती दिली. गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे नोंदवलेल्या जबाबानुसार, एखाद्या मोठ्या प्रकरणात जर अटक टाळण्याची असेल तर माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना 10 कोटी रुपये दे असं परमबीर सिंग यांनी मला सांगितलं होतं. या प्रकरणी परमबीर सिंग आणि प्रदीप शर्मा या दोघांनीही कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही आहे. जालानं यानं परमबीर सिंग, प्रदीप शर्मा आणि पोलीस निरीक्षक राजकुमार यांच्यावर वसुलीचे आरोप केलेत. या आरोपांची सध्या सीआयडी चौकशी करत आहेत. हेही वाचा- ''उद्धव बेटा, मला तुला भेटायचे आहे'' मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिकेची विनंती आपल्या निवदेनात जालान यांनी सीआयडी अधिकाऱ्यांना सांगितले की, मे 2018 मध्ये एका सट्टेबाजीच्या प्रकरणात ठाणे पोलिसांच्या ‘अँटी-एक्स्टॉर्शन सेल’ ने त्याला अटक केली होती. त्यानंतर आपल्याला तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे नेण्यात आलं होतं. पुढे जालान यानं दावा केला की, सिंग यांनी मला भारतातील सक्रिय क्रिकेट सट्टेबाजी करणाऱ्यांची माहिती विचारली. तसंच मला कुटुंबियातल्या सदस्यांसह एका मोठ्या प्रकरणात अटक करण्याची धमकी दिली. त्यामुळे अटकेपासून बचाव करायचा असेल तर प्रदीप शर्मा यांना 10 कोटी देण्यास सांगितल्याचा आरोप जालाननं जबाबात केला आहे. सिंग दोन दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा 24 मे रोजी परमबीर सिंग (Param Bir Singh)यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला. परमबीर सिंग यांना 9 जूनपर्यंत अटक होणार नाही आहे. परमबीर सिंग यांच्यावर 24 मेपर्यंत अटकेची कारवाई करू नये, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास राज्य सरकारला दिला होता. ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात सिंग यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हेही वाचा- Yaas Cyclone: 'या' 10 व्हिडिओतून दिसतं यास चक्रीवादळाचं रौद्ररुप परमबीर सिंग यांना तपास यंत्रणेला तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात केली. तसंच 9 जूनपर्यंत अटक करणार नसल्याची ग्वाही राज्य सरकारनं न्यायालयाला दिली आहे. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या सुट्टीकालीन न्यायालयापुढे आज यावर ऑनलाईन सुनावणी झाली.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Cricket, Paramvir sing

    पुढील बातम्या