पाऊस नाही, तरीही ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीची प्रचंड कोंडी कारण की...

पाऊस नाही, तरीही ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीची प्रचंड कोंडी कारण की...

मुंबई उपनगराकडून दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णत: खोळंबली आहे. परळ ते घाटकोपर दरम्यान वाहनांची रांग लागली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 जुलै : मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर परळ भागात पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी बघायला मिळते. मुंबई उपनगराकडून दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णत: खोळंबली आहे. परळ ते घाटकोपर दरम्यान वाहनांची रांग लागली आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांनी इस्टर्न एक्सप्रेस हायवे ऐवजी पर्यायी मार्गाचा वापर कराण्याचं आवाहन करण्यात येतंय. दरम्यान लालबाग, चिंचपोळी, काळाचौकी, आणि परळ या भागातील पाणीपुरवठा दिवसभरासाठी बंद आहे.

हेही वाचा

सगळ्यात जास्त रुग्ण आहेत डेंग्यूचे पण पालिका लसीकरण करणार टायफॉईडचे!

विराट कोहलीच्या नाही आता हिटमॅनच्या नावे आहे हा मोठा पराक्रम

फेसबुकला ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाचा दणका, ठोठावला 4.56 कोटीचा दंड

जलवाहिनी दुरस्तीचं काम 7-8 तास सुरू राहील. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक नायगाव आणि माटुंगा इथे वळवण्यात आलीय.

सकाळी आॅफिसची वेळ असल्यानं, रस्त्यावर जास्त गाड्या आहेत. बसेस, टॅक्सीज् यांची संख्या सकाळी जास्तच असते. त्यामुळे कोंडी जास्त होतेय. आणि चाकरमान्यांना आॅफिसला जायला उशीर होतोय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2018 11:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading