S M L

कौतुकास्पद !, माजी विद्यार्थ्यांनी साकारला शाळेचा डिजिटल वर्ग

मुंबईतील परळ येथील डाॅ शिरोडकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थी पास्ट फाॅर फ्यूचर ट्रस्ट तर्फे शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी 'आदर्श वर्ग' ( Digital Classroom) तयार करून दिला आहेत.

Sachin Salve | Updated On: Sep 4, 2017 09:24 PM IST

कौतुकास्पद !, माजी विद्यार्थ्यांनी साकारला शाळेचा डिजिटल वर्ग

04 सप्टेंबर : आजचा काळ हा डिजिटल असा समजला जातोय. त्यामुळेच डिजिटल युगाची वाट धरून काही माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतला एक वर्गच डिजिटल करण्याचा मानस पूर्ण केलाय.

ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो त्या शाळेतून आठवणीची शिदोरी घेऊन पुढील आयुष्यात आपण वाटचाल करतो. नोकरी, व्यवसाय, घर, संसारात रममान झालेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये मात्र एक विद्यार्थी हा दडलेलाच असतो. अशाच काही विद्यार्थ्यांनी 'काही तरी देणं लागतं' या विचारातून शाळेसाठी पुढे आले.  5 सप्टेंबर अर्थात शिक्षकदिनानिमित्त मुंबईतील परळ येथील डाॅ शिरोडकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थी पास्ट फाॅर फ्यूचर ट्रस्ट तर्फे शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी 'आदर्श वर्ग' ( Digital Classroom) तयार करून दिला आहेत.

डाॅ शिरोडकर हायस्कूलचे माजी विद्यार्थी पास्ट फाॅर फ्यूचर ट्रस्ट तर्फे गेली 3 वर्षांपासून अनेक शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले. आज यापुढे एक पाऊल टाकत  जगविख्यात सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कुंचल्यातून एक वर्ग डिजिटल केलाय.तसंच या वर्गाचे उद्घाटन डाॅ.सुप्रिया पाताडे-सहस्त्रबुद्धे या माजी विद्यार्थीनीच्या हस्ते बुधवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पार पडणार आहे.

या कार्यक्रमाला अॅड.माडेकर, शैलेश परब, महेंद्र पवार, डाॅ सुनील गुप्ते असे अनेक माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2017 09:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close