VIDEO : कल्याणमध्ये पप्पी गुंडाची दहशत, चौघांना रुग्णालयात घुसून मारहाण

VIDEO : कल्याणमध्ये पप्पी गुंडाची दहशत, चौघांना रुग्णालयात घुसून मारहाण

पोलिसांनी पप्पीला अटक करत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय.

  • Share this:

प्रदीप भणगे, प्रतिनिधी

कल्याण,21 आॅक्टोबर : कल्याण पूर्व परिसरात गेल्या वर्षभरापासून दहशत माजवणाऱ्या पप्पी उर्फ प्रथमेश गवळी या गुंडाला बेड्या ठोकण्यात आल्यात. शनिवारी रात्रीच्या सुमारास या गुंडाने गणेश पाटील या इसमासह इतर तीन जणांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने हे चौघे पप्पीच्या तावडीतून सुटले. पोलिसांनी पप्पीला अटक करत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण पूर्वेकडील चक्की नाका मलंग रोड परिसरात प्रथमेश गवळी उर्फ पप्पी या तरुणांची दहशत पसरत चाललीये. नागरिकाना क्षुल्लक कारणावरुन बेदम मारहाण केल्या प्रकरणी प्रथमेश गवळी उर्फ पप्पी वर गेल्या काही महिन्यात डझनभर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रत्येक वेळी पप्पीला अटक कऱण्यात येते मात्र जामीन मिळवत पप्पी आपल्या दहशती कारवाया सुरुच ठेवतो.

गणेश पाटील हे काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मलंगरोड जनकल्याण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आपल्या मुलीला औषध आणण्यासाठी खाली उतरले यावेळी पप्पी ने खाली तीन चार जणांना लाकडी दांडक्याने  मारहाण करत होता. त्याने अचानक मोर्चा गणेश पाटील यांच्याकडे वळवला आणि त्याने पाटील यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.

या घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांनी पप्पीला ताब्यात घेतले त्यामुळे पाटील सह इतर तीन जणांचा जीव वाचला.

पप्पी गुंडाची दहशत सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. पोलिसांनी पप्पीला अटक करत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. मात्र दहशत माजवून नागरिकांना विनाकारण मारहाण करणाऱ्या या पप्पी विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे.

==========================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2018 07:25 PM IST

ताज्या बातम्या