'महिलेला जिवंत जाळताना पसरली दुर्गंधी, नंतर मारेकऱ्यांनी लटकावले फासावर'

'महिलेला जिवंत जाळताना पसरली दुर्गंधी, नंतर मारेकऱ्यांनी लटकावले फासावर'

मारेकऱ्यांनी शारदा माळी यांना आधी जाळून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्घंधी पसरल्याने मारेकऱ्यांनी त्यांना फासावर लटकावून त्यांची निर्घृण हत्या केली, असा आरोप शारदा माळी यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 6 फेब्रुवारी:वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला असताना नवी मुंबईत अशीच एक घटना समोर आली आहे. एका 55 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. महिलेला जाळून मारण्याचा प्रयत्न झाला. मात्र, दुर्गंधी पसरल्याने मारेकऱ्यांनी महिलेला फासावर लटकावून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची आरोप महिलेच्या मुलीने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल केल्याने तर्कवितर्क मांडले जात आहेत.

मिळालेली माहिती अशी की, पनवेलमधील दुन्द्रे गावात ही धक्कादायक घटना आहे. शारदा माळी असं मृत महिलेचे नाव आहे. मारेकऱ्यांनी शारदा माळी यांना आधी जाळून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्घंधी पसरल्याने मारेकऱ्यांनी त्यांना फासावर लटकावून त्यांची निर्घृण हत्या केली, असा आरोप शारदा माळी यांच्या मुलीसह नातेवाईकांनी केला आहे. पाच संशयित आरोपी फरार असून त्यांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली आहे. राज्यात चार दिवसांत महिलेला जाळून मारण्याची तिसरी घटना घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हिंगणघाट पीडित युवतीचं मेडिकल बुलेटिन, डॉक्टरांनी व्यक्त केली 'ही' भीती

दुसरीकडे, औरंगाबाद जळीत कांडातील पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. औरंगाबादच्या सिल्लोडमधील अंधारी गावात या महिलेला गावातील बिअरबार मालकाने घरात घुसून पेटवलं होतं. पीडितेच्या मृत्यूमुळे संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे. तर हिंगणघाट इथली पीडित प्राध्यापिका अजूनही मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिन जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

हिंगणघाट येथील पीडित युवती अजूनही क्रिटिकल अजून इन्फेक्शन होण्याची भीती डॉ. दर्शन रेवनवार व्यक्त केली आहे. पीडितेची प्रकृती स्थिर आहे पण चिंताजनक आहे. शुक्रवारी तिची सर्जरी करणार करण्यात येणार असून अद्याप तिने डोळ्यांच्या पापण्या उघडल्या नसल्याची धक्कादायक माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

डॉ. राजेश अटल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. तिच्या सर्जरीमध्येही कॉम्प्लिकेशन वाढण्याची शक्यता आहे तर संसर्गदेखील होऊ शकतो. शुक्रवारी तिची ड्रेसिंग करण्यात येणार असून आज तिला रक्त देण्यात येणार आहे. प्रोटीनचा लॉस नको म्हणून औषधे देण्यात येत आहेत. तर घशाची सूज कमी होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

जळीत प्रकरणामध्ये संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. फुफ्फुसात संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्वचा जाळल्यानेदेखील संसर्ग होऊ शकतोय तर हृदयाची गती वाढली आहे. त्यामुळे सगळ्या बाजूने तिची काळजी घेण्यात येत आहे.

डॉ. अनुप मरार यांनीदेखील पीडितेच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. एक संपूर्ण आईसीयू युनिट केवळ या पीडितेसाठी राखीव करण्यात आले आहे. संसर्ग टाळण्यासाठी विशेष नर्स ठेवण्यात आल्या आहेत. युनिटमध्ये कुणालाही प्रवेश नाही. त्यामुळे येणाऱ्यांना विनंती आहे की रुग्णाला भेटण्याची मागणी करू नये असं त्यांनी जाहीर सांगितलं आहे.

हिंगणघाट आणि औरंगाबाद घटनेच्या निषेधार्थ आज वर्धा बंदची हाक

हिंगणघाट येथील प्राध्यापिका आणि औरंगाबाद येथल्या महिला जळीत प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज वर्धा शहरात सर्वपक्षीय मोर्चा व कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. मोर्चात शहरातील शाळा महाविद्यालयाचे विध्यार्थी तसेच सर्वपक्षीय नागरिक, सामाजिक संघटना आज रस्त्यावर उतरणार आहे.

औरंगाबाद जळीतकांडातील पीडीत महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. औरंगाबादच्या सिल्लोडमधील अंधारी गावात या महिलेला गावातील बिअरबार मालकाने घरात घुसून पेटवलं होतं. यात महिला 95 टक्के भाजली होती. महिलेवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र 95 टक्के भाजल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

First published: February 6, 2020, 4:38 PM IST

ताज्या बातम्या