पनवेल ते नेरूळ मेगाब्लाॅक 72 तासांनंतरही सुरूच, प्रवाशी लटकलेलेच !

मागील 4 दिवसांपासून हार्बर लाईन वरील पनवेल ते नेरुळ दरम्यान सुरू असलेला मेगा ट्रॅफिक ब्लॉक अद्यापही सुरूच आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 25, 2017 10:37 PM IST

पनवेल ते नेरूळ मेगाब्लाॅक 72 तासांनंतरही सुरूच, प्रवाशी लटकलेलेच !

25 डिसेंबर : पनवेल ते नेरुळ या रेल्वे मार्गादरम्यानचा मेगाब्लॉक बहात्तर तासांनंतरही संपलेला नाहीये. त्यामुळे नेरूळ-पनवेल प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मेगाहाल सुरुच आहेत.

मागील 4 दिवसांपासून हार्बर लाईन वरील पनवेल ते नेरुळ दरम्यान सुरू असलेला मेगा ट्रॅफिक ब्लॉक अद्यापही सुरूच आहे. सीवूड उरण रेल्वेमार्गासाठी हा मेगाब्लाॅक घेण्यात आला होता. आज दुपारी तीन वाजता हा मेगाब्लॉक संपणं अपेक्षित होतं. पण अजूनही या रेल्वेमार्गाचं काम सुरू आहे.

त्यामुळे नेरूळहून पनवेलकडं अजूनही लोकल निघालेली नाही. मेगाब्लॉक लांबल्यानं पनवेल आणि नवी मुंबईकरांचे हाल सुरू झालेत. प्रवाशांना नेरूळ किंवा पनवेल गाठण्यासाठी बस हा एकमेव पर्याय आहे. रिक्षाचालक प्रवाशांची लूट करतायत. ज्या बस सोडण्यात आल्यात त्या अपुऱ्या असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे.

दरम्यान, सायन पनवेल महामार्गावर कळंबोलीजवळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळताहेत.  पुण्याहून मुंबईच्या दिशेनं येणारी शेकडो वाहनं ट्रॅफिक जॅममध्ये अडकली आहेत.  शनिवार, रविवार आणि नाताळ या सलग तीन सुट्ट्या आल्यामुळे मुंबईकर बाहेरगावी गेले होते. मात्र सुट्ट्या संपल्यानंतर सगळेच मुंबईच्या दिशेनं परतायला सुरूवात झालीय. त्यामुळेच ही वाहतूक कोंडी झाल्याचं समजतंय. त्यामुळे तुम्ही सायन-पनवेल मार्गावरून प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ट्रॅफिकची थोडी माहिती घेऊनच बाहेर पडा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2017 10:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...