पनवेल पालिकेसाठी भाजपविरोधात शिवसेना-'स्वाभिमानी'ची युती

पनवेल पालिकेसाठी भाजपविरोधात शिवसेना-'स्वाभिमानी'ची युती

पनवेल महापालिका निवडणुकीत, शिवसेना स्वबळावर सर्व ७८ जागांवर निवडणूक लढण्याची तयारी केलीय

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई

05 मे : पनवेल महापालिका निवडणुकीत, शिवसेना स्वबळावर सर्व ७८ जागांवर निवडणूक लढण्याची तयारी केलीय. तसंच या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शिवसेनेला पाठिंबा दिलांय.

सत्तेत एकत्र असलेले महायुतीतील पक्षच आता एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढवणार आहेत. पनवेल महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि शेकाप असा आता सामना होणार आहे. उद्या पनवेल महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एकत्र पत्रकार परीषद होणार आहे. या पत्रकार परीषदेत या दोन्ही पक्षांची निवडणूक रणनिती अधिकृत जाहीर होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2017 08:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...