पनवेलमध्ये स्कोडा कारमधून १०० किलो गांजा जप्त, तिघांना अटक

पनवेलमध्ये स्कोडा कारमधून १०० किलो गांजा जप्त, तिघांना अटक

पनवेल-मुंब्रा मार्गावरून गुन्हे शाखा पोलिसांनी १०० किलो गांजा जप्त केला आहे. स्कोडा कारच्या डिकीमधून हा गांजा घेवून जाणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

21 मार्च : पनवेल-मुंब्रा मार्गावरून गुन्हे शाखा पोलिसांनी १०० किलो गांजा जप्त केला आहे. स्कोडा कारच्या डिकीमधून हा गांजा घेवून जाणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. हे तीनही आरोपी मुंब्य्राचे राहणारे असून आंध्र प्रदेशमधून ते विक्रीसाठी गांजा घेवून आले होते. दरम्यान पनवेल-मुंब्रा मार्गावर कारमधून मोठ्या प्रमाणात गांजा नेला जाणार असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस नाईक किरण राऊत यांना मिळाली होती.

यानुसार वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली धरणा गावाजवळील टोलनाक्यावर सापळा रचला होता. यावेळी स्कोडा कार (एमएच ०२ जेपी ९४३०) अडवून पोलिसांनी झडती घेतली असता कारच्या डिकीमध्ये गोणीत भरलेला गांजा आढळून आला.

याप्रकरणी कारमधील अमीर अहमद, सिराज अहमद चौधरी आणि मोहमद उस्मान सिध्दीकी यांना अटक करण्यात आली आहे. तसेच १०० किलो गांजासह स्कोडा कार देखील जप्त करण्यात आली आहे.

 

First published: March 21, 2018, 8:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading