मुंबई 12 फेब्रुवारी : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुंबईतील वरळी इथल्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन केलं. याच ठिकाणाहून पंकजा मुंडे आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. याच कार्यालयात पूर्वी भाजप नेते आणि पंकजा आणि प्रीतम मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घ्यायचे. गोपीनाथ मुंडे यांच्या दालनात पंकजा तर पंकजा मुंडे यांच्या दालनात प्रीतम मुंडे आता बसणार आहेत. या कार्यालयाच्या उद्धाटनाच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पंकजा मुंडे पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय होणार आहेत.
या उद्घाटनावेळी पंकजा मुंडे यांच्या मातोश्री प्रज्ञा मुंडे, तसंच भाजपचे नेते विनोद तावडे, आशीष शेलार, माजी मंत्री जयकुमार रावल, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, रासपचे नेते महादेव जानकर, आमदार मनीषा चौधरी, अमीत साटम, मोनिका राजळे, नमीता मुंडे, मेघना बोर्डीकर यांसह अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, वॉटर ग्रीड प्रकल्प, ऑनलाईन शिक्षक बदल्या, जलयुक्त शिवार असे प्रकल्प रद्द करण्यात येऊ नयेत. त्यात नाविन्यपूर्ण बदल करायचे असतील तर ते करावेत कारण हे लोकहिताचे प्रकल्प आहेत. वॉटर ग्रीड सारखी कामं महत्त्वाची आहेत पण रद्द करायचे आणि एका विभागावर पाण्यासाठी अन्याय करायचा हे योग्य नाही.
मंत्र्यांच्या बंगल्यांवर 15 कोटींची उधळपट्टी, कुठल्या नेत्यांसाठ किती रुपये?
या कार्यालयाच्या उद्धघाटनानंतर राज्यव्यापी दौरा करणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. त्यावरही त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मी महाराष्ट्रव्यापी दौरा करायचा की नाही याचा निर्णय अजून घेतला नाहीये असं त्यांनी सांगितलं.
मुंबई 23 बांगलादेशींना अटक, 'मनसे'च्या मोर्चानंतर पोलिसांची धडक कारवाई
लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या कार्यालयाची वास्तू परत सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आज पासून तयार आहे. 15, शुभदा अपार्टमेंट, सर पोचखानवाला मार्ग, वरळी, मुंबई 400 030 या वास्तूच्या नुतनीकरणा नंतर आज आई प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते वास्तू मध्ये प्रवेश केला. pic.twitter.com/Fc5NAmDt9H
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) February 12, 2020
त्या पुढे म्हणाल्या, सरकार बदलल्यानंतर प्रत्येक मंत्री आपल्या पद्धतीने बंगल्यामध्ये बदल करत असतात. मी माझा बंगला सोडला त्यावेळेस तो उत्तम अवस्थेत होता. प्रत्येक मंत्र्याला आपल्या बंगल्यात बदल करण्यासाठी जी रक्कम दिलेली असते त्यापेक्षा जास्त खर्च व्हायला नको.