मुंबई, 1 मार्च : पूजा प्रकरणावरुन वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) राजीनाम्यावरुन आता विरोधकांकडून पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला जात आहे. (Pankaja Mundes reaction to Dhananjay Mundes resignation) आज पंकजा मुंडेंनी माध्यमांशी संवाद साधताना याबाबत आपलं मत व्यक्त केलं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, वैयक्तिक बाबतीत विचार करता ज्यांच्यावर आरोप होत आहेत, त्यांनीच भूमिका घ्यावी'. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून वारंवार केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हरकत नाही, अशी सावध प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं.
सरकार टीकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातलं जात आहे, हे दुर्देवी आहे. संजय राठोड प्रकरणात निष्पक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी. सध्याच्या सरकारने जो पायंडा पाडला आहे, तो एका स्त्रीसाठी घातक आहे, असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली. (Pankaja Mundes reaction to Dhananjay Mundes resignation)
हे ही वाचा-मोदींनी घेतली स्वदेशी लस; शरद पवारांनी कुठली लस घेतली पाहा
यावेळी पंकजा मुंडे यांनी चित्रा वाघ यांचंही कौतुक केलं. चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचा मुद्दा लावून धरला होता व त्यावर आक्रमकपणे ठाकरे सरकारवर टीका करीत होत्या. संजय राठोड यांच्यावर इतरांनीही आरोप केले होते, मग चित्रा वाघ यांचेच फोटो माॅर्फ का करण्यात आले ? या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी आणि कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. मराठवाड्याचा विकास करण्यासाठी निधी देणं आवश्यक आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Dhananjay munde, Pankaja munde, Sanjay rathod