सर्वोच्च न्यायालयाचा पंकजा मुंडे यांना दणका; 6 हजार 300 कोटी कंत्राट केले रद्द

सर्वोच्च न्यायालयाचा पंकजा मुंडे यांना दणका;  6 हजार 300 कोटी कंत्राट केले रद्द

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार आणि मंत्री पंकजा मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली/मुंबई, 09 मार्च: राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार आणि मंत्री पंकजा मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. मुंडे मंत्री असलेल्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या 6 हजार 300 कोटी रुपयांचे आहार कंत्राट सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच याचा फाटका राज्य सरकारला आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

महिला व बालविकास मंत्रालयाने अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार पुरवठा करण्यासाठी 2016मध्ये हे कंत्राट दिले होते. हे कंत्राट देताना नियमांचे उल्लंघन झाल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायाधीश अरुण मिश्रा आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने 26 फ्रेब्रुवारी रोजी कंत्राट रद्द करण्याचा आदेश दिला होता.

मंत्रालयाकडून कंत्राट देताना महिला बचत गटांना डावलण्यात आले. काही मोठ्या उद्योजकांना फायदा मिळवून देण्यासाठी कंत्राटामध्ये तांत्रिक आणि आर्थिक अटी बदलण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. कंत्रात देताना नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राट रद्द करत चार आठवड्यात नवे कंत्राट काढण्याचे आदेश देखील देण्यात दिले आहेत. तसेच नव्याने काढण्यात येणाऱ्या कंत्राट महिला बचत गटांचा समावेश होईल याची काळजी घेण्यास न्यायालयाने बजावले आहे.

या बाबत वैष्णोराणी महिला बचत गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हा निकाल देताना न्यायालयाने नवे कंत्राट जारी होईपर्यंत लहान मुले व महिलांसाठी पर्यायी मार्गाने पोषण आहाराची सोय करावी असे सांगितले आहे.


Loading...

Special Report : रेस्क्यूचा थरार, 50 फूट खोल विहिरीतून 2 बिबट्यांना काढलं बाहेर


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 9, 2019 04:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...