मुंबई, 23 जानेवारी : 'माझ्या उपस्थितीतील हे कदाचित शेवटचे महालक्ष्मी सरस आहे. पुढल्या वर्षी मी महिला-बालविकास मंत्री असेल की नाही हे माहित नाही,' असं विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
'पुढच्या वेळी आमचीच सत्ता येईल यात शंका नाही. मात्र सत्ता आल्यावर मी याच खात्याची मंत्री असेल की नाही, हे माहित नाही. पण मला याच खात्याचं काम करायला आवडेल,' असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्या हत्येचा खळबळजनक दावा सायबर एक्सपर्ट शुजाने केल्यानंतर आज पहिल्यांदाच पंकजा मुंडे जाहीर कार्यक्रमात सहभागी झाल्या. या कार्यक्रमात त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
आपल्या भाषणात काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
- राज्यात पहिल्यांदा ग्राम विकास खात्याचं नेतृत्व महिलेला देण्यात आलं आणि मला ग्रामीण स्त्रियांचं नेतृत्व करायची संधी मिळाली
- मागच्या वर्षी महालक्ष्मी सरसमध्ये 10 कोटींचा उलाढाला झाली. याही वर्षी त्यापेक्षा जास्त होईल, असा विश्वास आहे.
- महिलेला एखादी गोष्ट दिली तर त्याचा संसर्ग होतो, त्यामुळे महिलेला ताकद, वैभव, आत्मविश्वास मिळाला तर अशा चांगल्या गोष्टींचा संसर्ग होईल
- मला माहिती नाही पुढच्या वेळीस माझ्याकडे कुठलं खातं असेल पण सत्ता आमची येणार यात शंका नाही.
- मला चॉईस दिला तर मला महिला-बालविकास मंत्री म्हणून पुन्हा काम करायला आवडेल
Special Report : जयंत पाटलांनी दुखऱ्या नसेवर हात ठेवताच खडसेंनी बोलून दाखवली खंत