Home /News /mumbai /

पंकजा मुंडेंना आला अमित शहांचा फोन आणि...

पंकजा मुंडेंना आला अमित शहांचा फोन आणि...

Amit Shah call to Pankaja Munde: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना फोन केला.

    मुंबई, 27 जुलै: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रितम मुंडे (Pritam Munde) यांना डावलण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet) स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि प्रितम मुंडे नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर भाजप नेत्यांचे फोटो नसल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. याच दरम्यान 26 जुलै रोजी सकाळीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थेट पंकजा मुंडे यांना फोन केला. झालं असं की, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा 26 जुलै रोजी वाढदिवस होता. यासाठी अमित शहा यांनी पंकजा मुंडे यांना फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये पंकजा मुंडेंनी म्हटलं "आभार !!! दिवसाची सुरुवात अमित भाईंच्या फोनने तर दिवसभर अनेक नेत्यांच्या, केंद्रीय व राज्यातील मंत्री आणि सहकाऱ्यांच्या दोन्ही छत्रपतींच्या, राज्यपालांच्या आणि तुमच्या सर्वांच्या मोलाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या निमित्त इतके प्रेम आणि आशीर्वादाने माझी ऊर्जा द्विगुणित झाली.. मी ऋणी आहे." पंकजा मुंडेंनी मानले काँग्रेस नेत्याचे आभार काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत पंकजा मुंडे यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं, "माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा". विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या या ट्विटनंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत त्यांचे आभार मानले आहेत. शुभेच्छांच्या बॅनरवरुन भाजप नेते गायब पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बीडमध्ये पोस्टर्स लावण्यात आले होते. मात्र, त्यावर भाजप नेत्यांचे फोटो नसल्याने विविध चर्चा रंगल्या होत्या. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, पंकजाताई यांनी त्यांच्या वाढदिवसाचे पोस्टर लावले नाही ते कुणी तरी कार्यकर्ताने लावले आहे. त्यामुळे त्या नाराज असे म्हणणे त्यांच्यावर अन्याय करणारे होईल.
    First published:

    Tags: Pankaja munde

    पुढील बातम्या