'मी पुन्हा येईन' याचा त्रास फडणवीसांना पुढची 5 वर्ष होणार - पंकजा मुंडे

'मी पुन्हा येईन' याचा त्रास फडणवीसांना पुढची 5 वर्ष होणार - पंकजा मुंडे

मला पुन्हा शुन्यातून नवीन काही निर्माण करायचं आहे. मला स्वत:ला आजमावयाचं आहे. मी नाराज नाही.

  • Share this:

मुंबई 14 डिसेंबर : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथ गडावरच्या भाषणाने राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण केलं होतं. त्यानंतर भाजपमध्ये सगळचं काही अलबेल नाही ही चर्चा सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी अनेक गोष्टींवर स्पष्टीकरण दिलंय. मी बोललेली नसतानाही मला जनतेच्या मनातली मुख्यमंत्री या वाक्याने गेली 5 वर्ष छळलं होतं. देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीतही तसच झालंय. त्यांच्या मनात काही नसेल, मात्र त्यांच्या मी पुन्हा येईल या कवितेमुळे त्यांना टीकेचं धनी व्हावं लागलं आणि पुढची पाच वर्ष त्यांना ते छळणार आहे असं मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. त्या म्हणाल्या, फडणवीसांच्या किंवा माझ्या मनात त्यावेळी बोलताना तसं काहीच नव्हतं मात्र आम्हाला त्यावरून टीका सहन करावी लागली. फडणवीसांनाही त्या कवितेचा त्रास होण्याची शक्यता आहे.

अजित पवारांनी NCPच्या आमदारांना दिला दम, म्हणाले...

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या,  त्रास सहन करण्याची ताकद माझ्यात आहे. त्यामुळे तणाव नाही. पण काही गोष्टींमुळे अस्वस्थ मात्र आहे. माझ्या ट्वीटरवर कमळ किंवा भाजप कधीच नव्हतं. काही लोकांनी उगाच त्या गोष्टींचा बाऊ केला गेला. काहीही कारण नसताना मी पक्ष सोडणार, बंड करणार अशा वावड्या उठवल्या गेल्या त्यामुळे मी अस्वस्थ आहे. मी आता कुठल्याच पदावर नाही त्यामुळेही कार्यकर्त्यांशी बोलायचं आहे. मी विरोधीपक्ष नेते पद मिळविण्यासाठी किंवा कुठलं पद मिळविण्यासाठी दबाव निर्माण करते असं सांगितलं जात होतं. माझ्याकडे एकमेव पद होतं ते म्हणजे कोअर कमेटीचं सदस्यपद. त्यामुळे मीच ते पद सोडलं.

1 ते 12 डिसेंबरच्या दिवसांमध्ये जे झालं त्यामुळेच मी कोअर कमेटीचं पद सोडलं. मला त्या निर्णय प्रक्रियेचा भाग राहायचं नाही. दिल्लीचा पाठिंबा असल्याने मी बंड करते असं म्हटलं जातं ते चुकीचं आहे. मी दिल्लीतल्या नेत्यांशी चर्चा केली नाही. मला त्याची गरजही नाही. मला पुन्हा शुन्यातून नवीन काही निर्माण करायचं आहे. मला स्वत:ला आजमावयाचं आहे. राजकारणात यायची माझी इच्छा नव्हती. लोकांच्या पाठिंब्यामुळेच मी राजकारणात आले.

दादा, तुम्ही DCM झालंच पाहिजे, कार्यकर्त्याच्या मागणीला अजित पवारांचं हे उत्तर

पराभव झाल्यानंतर मी लगेच तो मान्य केला. माझ्या विरोधात सगळे एकत्र आले हीच माझी शक्ती आहे.  मी गोपीनाथ मुंडें प्रतिष्ठानच्या माध्यमातूनच काम करणार. कारण शेवटी काम करण्याचं स्वातंत्रही महत्त्वाचं असतं. मी हे काम करणं कसं सोडून देऊ. मला आता काहीच नको.  'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. ज्यांचं अस्तित्वच पणाला लागलं त्यांच्याविषयी फार अपेक्षा ठेवता येत नाही.  हा पक्ष मुठभरांचा होऊ नाही म्हणून प्रयत्न केले पाहिजेत.

वंजारी समाजाला जास्त तिकीटं द्यायला पाहिजे होतं. उद्धव ठाकरे यांच्याशी कौटुंबीक संबंध आहेत. ते संबंध राजकारणापलिकडे आहेत. मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री असं कधीच म्हटलं नाही. त्या वक्तव्यामुळे मला फायदा झालं की नुकसान हे भविष्यात कळेलच.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2019 05:48 PM IST

ताज्या बातम्या