पंकजा मुंडेंनी 'गोपिनाथ प्रतिष्ठान' पुन्हा सुरू करण्याची तारीख ढकलली पुढे

पंकजा मुंडेंनी 'गोपिनाथ प्रतिष्ठान' पुन्हा सुरू करण्याची तारीख ढकलली पुढे

भाजप सोडणार नाही, असं सांगत मुंबईत 'गोपिनाथ प्रतिष्ठान'चं कार्यालय पुन्हा सुरू करण्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.

  • Share this:

मुंबई,19 जानेवारी: भाजप सोडणार नाही, असं सांगत मुंबईत 'गोपिनाथ प्रतिष्ठान'चं कार्यालय पुन्हा सुरू करण्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मशाल हातात घेऊन राज्यभर दौरा करणार असल्याचेही पंकजा त्यावेळी म्हणाल्या होत्या. मात्र, दिवंगत भाजप नेते गोपिनाथ मुंडे साहेबांच्या वरळी येथील 'शुभदा' बिल्डिंगमधील 'गोपिनाथ प्रतिष्ठान'चं कार्यालय सुरू करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या 26 जानेवारीला 'गोपिनाथ प्रतिष्ठान'चं कार्यालय सुरू करण्यात येणार होतं, पण सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, लोकप्रतिनिधी व सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाने तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. आता 'गोपिनाथ प्रतिष्ठान'चं उद्घाटन 5 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता होणार आहे.

पंकजा मुंडे यांनी गोपिनाथगडावरून दिला होता 'लक्ष्यवेधी' इशारा

दिवंगत भाजप नेते गोपिनाथ मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त पंकजा मुंडे यांनी गोपिनाथ गडावर मोठी सभा घेतली होती. "मी बंड करणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या, ते शोधून काढावं", असं पक्षाला सांगत पंकजांनी सध्या तरी पक्ष सोडण्याच्या चर्चेला विराम दिला आहे. पण 26 जानेवारीला आपण मुंबईत एक नवं कार्यालय सुरू करणार असंही त्या म्हणाल्या होत्या.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या सभेला उपस्थित होते. त्यांच्यासमोरच एकनाथ खडसे यांनी मन मोकळं करत फडणवीसांवर नाव न घेता आरोप केले. नंतर भाषणाला उभ्या राहिलेल्या पंकजा म्हणाल्या, मन मोकळं केलं नाही, तर विष बनतं. आपण पक्ष सोडून जाणार नाही, हे स्पष्ट करताना पंकजा यांनी एक मोठा इशाराही दिला. बॉल भाजपच्या कोर्टात आहे, असं सांगताना म्हणाल्या, "मी बंड करणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या, ते शोधून काढावं."

भाजप सोडणार नाही, असं सांगत असतानाच त्यांनी 26 जानेवारीला गोपिनाथ प्रतिष्ठानचं कार्यालय मुंबईत सुरू करणार असल्याची घोषणा केली. मी मशाल घेऊन राज्यभर दौरा करणार, असं पंकजा म्हणाल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2020 03:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading