मुंबई, 13 जुलै : बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet) स्थान न मिळाल्याने त्यांचे समर्थक चांगलेच नाराज झाले. या नाराजीनंतर त्यांनी आपले राजीनामे सत्र सुरू केलं. याच दरम्यान पंकजा मुंडे (Pankaja Munde) दिल्लीत जावून भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. त्यानंतर आता पंकजा मुंडे मुंबईत आल्या आहेत. मुंबईत आपल्यावर पंकजा मुंडे आपल्या समर्थकांसोबत संवाद साधत आहेत.
माझ्या समाजाच्या मंत्र्याला मी कशाला अपमानित करू
मंत्रिपदाची मागणी हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार नाहीत. मला कधी वाटलं नाही, मला मंत्री करा संत्री करा. माझ्या समाजाच्या मंत्र्याला मी कशाला अपमानित करू. प्रितम ताई मंत्री नाही झाल्या. मी 45 वर्षांची आहे. कराड साहेब 65 वर्षाचे आहे. मी त्यांचा अपमानित करणार नाही असं म्हणत भागवत कराड यांना मिळालेल्या मंत्रिपदावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे
पंकजा मुंडेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलं
मी घरात बसणार आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार हे मान्य नाही
मी तुम्हाला शांत करण्यासाठी वेळ दिला आहे
तुम्ही जे केलं ते मला विचारून केलं का?
तुमच्या रक्तात राग आहे
लोकांची काम करण्यासाठी मी राजकारणात
मी तुमच्या सर्वांचे राजीनामे नामंजुर करत आहे
मी कोणतंही पद मिळवण्यासाठी राजकारणात नाही
मी तुमच्या प्रेमाबद्दल रून व्यक्त करते
तळागाळातील माणूस सर्व ठिकाणी पोहोचला पाहिजे हे मुंडे साहेबाना वाटतं होते
मुंडे साहेबाना वाटतं होत की महाराष्ट्राची व्हावी
मला राजकारणात आणलं कारण मोठ्या आणि भव्य विचाराने आणले
मंत्रिपदाची मागणी हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार नाहीत
मला कधी वाटलं नाही. मला मंत्री करा संत्री करा
मला दिल्लीत कुणीही झापलं नाही
माझ्या समाजाच्या मंत्र्याला मी कशाला अपमानित करू
भागवत कराड यांना मिळालेल्या मंत्रिपदावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया
जोपर्यंत शक्य तोपर्यंत धर्मयुद्ध टाळायचा प्रयत्न करणार
मी कुणालाही भीत नाही
आपलं घर का सोडायचं? राजीनामा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडेंचा सवाल
माझा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे पी नड्डा आहेत
मी पराभूत झाले मला वाईट वाटत नाही
मला दबाव तंत्र आणायची गरज नाही
तुम्हाला वाटतं मला छापले असेल
माझी पंतप्रधानांबरोबर चांगली चर्चा झाली
तुम्हाला वाईट दिसत आहे. जरा डोळे चोळून बघूया.
केंद्रीय मंत्री नाही तरी संघटन मंत्री आहे
प्रितम ताई मंत्री नाही झाल्या. मी 45 वर्षांची आहे. कराड साहेब 65 वर्षाचे आहे. मी त्यांचा अपमानित करणार नाही
मी कधी म्हटले नाही मला मुख्यमंत्री करा पण लोक पंतप्रधान होतो म्हणतात
आम्ही नविन काळातली योध्या आहे
मला शक्य आहे तोपर्यंत मी धर्म युद्ध रोखण्याचा प्रयत्न करेन
कौरवांच्या सेनेत अनेक लोक आहेत जे शरीराने त्यांच्या बरोबर आणि मनाने पांडवाबरोबर होते
इतक्या चिल्लर लढाईत मी पडत नाही
आज आपण धर्म युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहोत
सगळ्यांनी सांगितले की मिळायला पाहिजे होते
केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा
मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला
घर फुटल्याचं दु:ख आम्ही झेललं आहे
दिल्लीवारीनंतर कार्यकर्त्यांसोबत बैठक
दिल्लीवरुन मुंबईत आलेल्या पंकजा मुंडे आज आपल्या निवडक कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत आहेत. या बैठकीसाठी बीड जिल्ह्यातून निवडक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. आपल्या निवडक कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुन पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले लावले जात आहेत.
पंकजा मुंडेंनी दिल्लीत घेतली पंतप्रधान मोदींची भेट
दिल्लीत भाजपच्या सर्व राष्ट्रीय सचिवांची दोन दिवसांपूर्वी एक बैठक आयोजित कऱण्यात आली होती. या बैठकीला महाराष्ट्रातून पंकजा मुंडे, विनोद तावडे दाखल झाले होते. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सचिवांची जवळपास दीड तास बैठक झाली. या बैठकीत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि संघटनात्मक जबाबदारी आदी विषयावर विस्ताराने चर्चा झाली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी बैठक झाली. महत्वाचे म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात डॉ प्रीतम मुंडे यांना स्थान न दिल्यामुळे मुंडे समर्थक कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे राज्यात राजीनामा सत्र सुरू असून मोदींसोबतच्या बैठकीत पंकजा मुंडे यांची काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकलेलं नाहीये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pankaja munde