घोषणा केल्यानंतरही पंकजा मुंडे मंत्रालयात, राष्ट्रवादीच्या आमदाराने अडवलं

घोषणा केल्यानंतरही पंकजा मुंडे मंत्रालयात, राष्ट्रवादीच्या आमदाराने अडवलं

'मंत्रिमंडळ बैठकीला जाताना मी पंकजा मुंडे यांना अडवलं आणि त्यांना धनगर आरक्षण कधी देणार असा जाब विचारला'

  • Share this:

मुंबई, 8 जानेवारी : 'जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मंत्रालयात पाय ठेवणार नाही,' अशी घोषणा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केली. पण त्यानंतरही आज पंकजा मुंडे या मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर राहिल्याचं पाहायला मिळालं.

'मंत्रिमंडळ बैठकीला जाताना मी पंकजा मुंडे यांना अडवलं आणि त्यांना धनगर आरक्षण कधी देणार असा जाब विचारला,' असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रामराव वडकुते यांनी केला आहे. त्यामुळे धनगर आरक्षणावरून आता सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपण्याची शक्यता आहे.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

राज्यात धगधगणाऱ्या आरक्षणाच्या प्रकरणात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीसुद्धा उडी घेतली आहे. जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मंत्रालयात पाऊल टाकणार नाही असा पक्का निर्धार त्यांनी जाहीर केला.

नांदेडच्या मळेगाव इथे सुरू असलेल्या खंडोबाच्या यात्रेला पंकजा मुंडे यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी पार पडलेल्या धनगर आरक्षण जागर परिषदेत पंकजा यांनी हे विधान केलं. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी धनगर समाजानं लावून धरली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार नेमकी कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

VIDEO : तोपर्यंत मंत्रालयात पाऊल टाकणार नाही -पंकजा मुंडे

First published: January 8, 2019, 1:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading