Elec-widget

भाजप सोडणार का? 'त्या' फेसबुक पोस्टबद्दल पंकजांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

भाजप सोडणार का? 'त्या' फेसबुक पोस्टबद्दल पंकजांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

'मी कोणत्याही पदासाठी लाचारी स्वीकारली नाही. कोणतंही पद मिळावं म्हणून दबावतंत्र केलं नाही, हे माझ्या रक्तात नाही.'

  • Share this:

मुंबई, 03 डिसेंबर : 'मला तुमच्याशी बोलायचंय, 12 डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू' अशी पोस्ट फेसबुकवर टाकून भाजपच्या नेत्या आणि माजी महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या पक्ष सोडणार अशी राजकीय चर्चा रंगली होती. अखेर, या फेसबुक पोस्टवर पंकजांनी खुलासा केला आहे.

'मी दरवर्षी 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर जात असते. पण, त्यानंतर सर्वच वृत्तवाहिन्यांनी मी भाजप सोडणार अशी चर्चा सुरू झाली. या वृत्तांमुळे मी प्रचंड व्यथित आणि दुखी झाली आहे. या चर्च्यामुळे मी कुठल्या पदासाठी हे करतेय का असंही भासवण्यात आलं. याआधीही मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री, अशा बातम्याही पेरण्यात आल्या होत्या. हे अत्यंत चुकीचं होतं, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली.

तसंच मी कोणत्याही पदासाठी लाचारी स्वीकारली नाही. कोणतंही पद मिळावं म्हणून दबावतंत्र केलं नाही, हे माझ्या रक्तात नाही. मला आत्मचिंतन आणि माझ्या लोकांशी बोलण्यासाठी मला वेळ द्या, अशी विनंतीही पंकजांनी केली.

फडणवीसांनी केला पंकजांना फोन

दरम्यान, पंकजा मुंडे यांची आज भाजप नेत्यांकडून मनधरणी करण्यात आली. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा यांच्याशी फोनवर चर्चा केली. या दोघांमध्ये विविध राजकीय विषयांवरच चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Loading...

विनोद तावडे भेटीला

तर दुसरीकडे माजी मंत्री विनोद तावडे, बबनराव लोणीकर, राम शिंदे यांनी आज पंकजा मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. पंकजाताईंची नाराजी दूर करण्यासाठीच ही भेट असल्याचं सांगितलं जातंय. पंकजा या भाजप सोडून जाणार नाही, 12 डिसेंबरला त्या आपल्या समर्थकांना योग्य ते मार्गदर्शन करतील, असं तावडेंनी स्पष्ट केलं.

काय म्हणाल्या पंकजाताई...

नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे...

''निवडणुका झाल्या निवडणुकीचे निकाल ही लागले. निकालानंतर राजकीय घडामोडी, कोअर कमिटीच्या बैठका, पक्षाच्या बैठका, हे सर्व आपण सर्वजण पहात होता. पराभव झाल्यानंतर काही क्षणातच माध्यमांसमोर जाऊन मी तो स्वीकारला. आणि विनंती केली की कुणीही याची जबाबदारी कुणावरही टाकू नये. सर्व जवाबदारी माझी आहे.

दुसऱ्याच दिवशी पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीस मी हजरही झाले.'आधी देश,नंतर पार्टी आणि शेवटी स्वत:' हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. जनतेप्रती आपल्या कर्तव्यापेक्षा मोठं काहीही नसतं असं मुंडेसाहेबांनी लहानपणापासून शिकवलेलं आहे. त्यांच्या शिकवणी नुसार त्यांच्या मृत्युनंतर अगदी तिसऱ्याच दिवशी मी कामाला लागले.

पाच वर्षे सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. मला ही सेवेची संधी केवळ आणि केवळ तुमच्या विश्वासामुळे मिळाली आणि आज पराभवानंतर माझ्याहीपेक्षा व्यथित माझ्या लोकांनी मला इतके मेसेजेस केले, इतके फोन केले, इतके निरोप दिले. "ताई आम्हाला भेटायला वेळ द्या," .."ताई आम्हाला तुम्हाला बघून तरी जाऊ द्या "...किती संवेदना तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केली .

मी तुम्हा सर्वांची खुप खुप आभारी आहे. मला याची पुर्ण जाणीव आहे की तुमचं प्रेम हे माझ्यावर आहे आणि तेच माझं कवचकुंडल आहे. मुंडेसाहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं. एका क्षणात ते आपल्यातून निघूनही गेले. पहील्यांदा मुंडेसाहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात जनते प्रती असलेल्या जवाबदारी म्हणुन राजकारणात राहीले. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे.

आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे...

आठ ते दहा दिवसांनंतर...हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे.

12 डिसेंबर,लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस...त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त...जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं.. तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांच्या विषयी बोलतेय ...तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे..नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे?

12 डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू !!

येणार ना मग तुम्ही सर्व? मावळे येतील हे नक्की !!!!''

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2019 06:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com