मराठा आरक्षण : नाराजीच्या वृत्ताबाबत काय म्हणाल्या पंकजा मुंडे? जाणून घ्या

मराठा आरक्षण : नाराजीच्या वृत्ताबाबत काय म्हणाल्या पंकजा मुंडे? जाणून घ्या

मराठा समाजाला किती टक्के आरक्षण देण्यात येणार आहे, यावरून मी नाराज नाही, असं स्पष्टीकरण भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 29 नोव्हेंबर : मराठा समाजाला किती टक्के आरक्षण देण्यात येणार आहे, यावरून मी नाराज नाही, असं स्पष्टीकरण भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिलं आहे. आरक्षणाबाबतच्या मंत्रिमंडळ बैठकीतून पंकजा मुंडे नाराज होऊन बाहेर पडल्याची चर्चा होती. त्यावर पंकजा मुंडे यांनी हे स्पष्टकरण दिलं आहे.

मंत्रिमंडळ उपसमितीच्या सदस्या नसतानाही आपलं मत मांडण्यासाठी पंकजा मुंंडे या बैठकीत गेल्याची माहिती समोर आली होती. या बैठकीत ओबीसींच्या मुद्द्यावरून मतभेद झाले असण्याची शक्यता वर्तवली जात होती.पण पंकजा मुंडे यांनी आता याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. माझा आरक्षणाला कसलाही विरोध नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

काही वेळापूर्वी मराठा आरक्षणाबाबतचा एटीआर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत  मांडला आहे.

 मराठा आरक्षणाच्या एटीआरमध्ये काय तरतुदी करण्यात आल्या?

- मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणार

- एकूण नियुक्तांच्या 16 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे

- एसईबीसीच्या आरक्षणसाठी उन्नत आणि प्रगत गटाचं प्रतिनिधित्त्व

- मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 16 टक्के आरक्षण

- एसईबीसी वर्गातलं आरक्षण गुणवत्तेनुसार

- ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का नाही

 

दरम्यान, भाजपतर्फे औरंगाबादेत जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे. भाजप प्रदेश कार्यालयावर आरक्षणाचा जल्लोष होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेदेखील जल्लोषात सामील होणार आहेत. पेढे आणि ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करण्यात येणार आहे.

VIDEO : 'पोराचं लग्न झालं, आज पूजा होती पण क्षणात उद्ध्वस्त झाला संसार'

First published: November 29, 2018, 1:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading