पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होणारच पण भगवानबाबांच्या जन्मभूमीत !

पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होणारच पण भगवानबाबांच्या जन्मभूमीत !

भगवानगडावर दसरा मेळावा घेण्यास अहमदनगर जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे आता भगवानबाबांच्या जन्मभूमीत म्हणजेच सावरगावात दसरा मेळावा घेणार आहेत. पण पंकजा मुंडेंनी दसरा मेळावा भगवानगडाऐवजी भगवानबाबांच्या जन्मभूमीत घेऊन एकप्रकारे भगवानगडाचं पर्यायाने महत्वच कमी करण्याची चाल खेळल्याचं बोललं जातंय.

  • Share this:

मुंबई, 29 सप्टेंबर : भगवानगडावर दसरा मेळावा घेण्यास अहमदनगर जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे आता भगवानबाबांच्या जन्मभूमीत म्हणजेच सावरगावात दसरा मेळावा घेणार आहेत. सावरगाव हे बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यात येतं. त्यामुळे आपल्या होम पीचवर पंकजा मुंडे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. पण पंकजा मुंडेंनी दसरा मेळावा भगवानगडाऐवजी भगवानबाबांच्या जन्मभूमीत घेऊन एकप्रकारे भगवानगडाचं पर्यायाने महत्वच कमी करण्याची चाल खेळल्याचं बोललं जातंय.

भगवानगडाच्या वर्चस्ववादात मुख्यमंत्र्यांचं पाठबळ असलेल्या जिल्हा प्रशासनाने नामदेवशास्त्रींच्या बाजुने कौल दिल्यानंतर पंकजा मुंडेंनी आता थेट भगवानगडाचेच महत्व कमी करण्याची तिरकी चाल खेळलीय. कारण पंकजा मुंडेंना वंजारी समाजाचं एकहाती नेतृत्व हवंय. भगवानगडावर दसरा मेळाव्या परंपरा सुरू करून गोपीनाथ मुंडेंनी राज्यात आणि देशात आपलं राजकीय वजन वाढवलं होतं. पण त्यांच्या पश्चात पंकजा मुंडे काहिशा एकाकी पडल्याचं पाहायला मिळतंय. कारण गोपीनाथ मुंडेंनीच भगवानगडाच्या महंतपदी बसवलेल्या नामदेवशास्त्रींनीच त्यांची मुलगी पंकजा मुंडेंना भगवानगडावर राजकीय मेळावा घेण्यास ठाम नकार दिला. अशातच भगवानगड वर्चस्ववादाच्या या लढाईत नामदेशशास्त्रींना पंकजा मुंडेंच्या पक्षांतर्गंत तसंच पक्षाबाहेरच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांनीही छुपं पाठबळ दिल्याने पंकजा मुंडेंचा नाईलाज झाला. म्हणूनच भगवानगडावरचा संघर्ष टाळण्यासाठी पंकजा मुंडेंनी नामदेवशास्त्रींचं महत्वच कमी करण्यासाठी दसरा मेळाव्याचं ठिकाणच बदलून टाकलं. अर्थात त्यांच्या मेळाव्याला किती गर्दी होतेय त्यावरच या राजकीय खेळीचं यशापयश अवलंबून असणार आहे.

खरंतर दोन्ही बाजुंच्या समर्थकांमध्ये भगवानगडावर कोणताही संघर्ष होऊ नये, यासाठी पंकजा मुंडेंनी नामदेवशास्त्रांनी पत्राद्वारे धमकीवजा भावनिक सादही घालून पाहिली होती. पण मुख्यमंत्री आणि धनजंय मुंडेंचं छुपं पाठबळ असलेल्या नामदेवशास्त्रींनी हा प्रस्ताव साफ धुडकावून लावला. त्यातूनच मग पंकजा मुंडेंनी थेट भगवानगडाचं महत्व कमी करण्याची राजकीय चाल खेळलीय. पण वंजारी समाज नेमका कोणाच्या बाजुने आहे ते दसऱ्याला भगवानगडावर आणि पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला होणाऱ्या गर्दीवरूनच ठरणार आहे.

First published: September 29, 2017, 9:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading