S M L

पंकज भुजबळांनी घेतली मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट

आज अनपेक्षितपणे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय.

Chittatosh Khandekar | Updated On: May 9, 2018 03:50 PM IST

पंकज भुजबळांनी घेतली मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट

09 मे: एकीकडे  छगन  भुजबळ राष्ट्रवादीतून जोरदार कमबॅक करण्याच्या तयारीत असताना त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांनी मात्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.  काल सामना वर्तमानपत्रात  छगन भुजबळांची स्तुती करण्यात आली होती.

आज अनपेक्षितपणे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय.  परवाच्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळ यांचं कौतुक केलं होतं. त्यानंतर ही भेट झालीय. त्यामुळे भुजबळ कुटुंबियांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित होतो.

शिवसेनेचं आणि छगन भुजबळांचं नातं तसं  जुनं  आहे.  छगन भुजबळ हे शिवसेनेचे पहिले महापौर होते.   भुजबळ २५ वर्ष शिवसेनेत कार्यरत होते.भुजबळांनी शिवसेनेचा नगरसेवक, महापौर आणि आमदार अशी सर्व पदं भूषवली आहेत. भुजबळांनी शिवसेना सोडली होती, तेव्हा शिवसैनिकांनी छगन भुजबळांवर केलेला हल्ला, हा चर्चेचा विषय होता.

आता राज्यात काय नवीन राजकारण बाळसं धरतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 9, 2018 03:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close