खवल्या मांजराची तस्कारी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

खवल्या मांजराची तस्कारी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

दुर्मिळ आणि नामशेष होत चाललेल्या खवल्या मांजराची तस्कारी करणाऱ्या एका टोळीचा ठाणे क्राईम ब्रान्चने पर्दाफाश केलाय.

  • Share this:

अजित मांढरे, ठाणे, 12 ऑक्टोबर : दुर्मिळ आणि नामशेष होत चाललेल्या खवल्या मांजराची तस्कारी करणाऱ्या एका टोळीचा ठाणे क्राईम ब्रान्चने पर्दाफाश केलाय. धक्कादायक बाब म्हणजे, आतापर्यंत समोर आलेल्या घटनांमध्ये या प्रजातीच्या मांजराची शिकार करून त्याच्या शरिरावर असलेल्या खवल्यांची तस्करी केली जायची. पण, यावेळी थेट जिवंत खवल्या मांजराची तस्करी केली जाणार असल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रांचला मिळाली होती.

ठाण्यातल्या साकेत रोडवरील बाळकूमच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर काही तस्कर जिवंत खवल्या मांजर घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रांचला मिळाली मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि देवजी सावंत, रामदास पाटील आणि संजय भोसले या रायगड जिल्ह्यातील ३ तस्कारांना अटक केली.

त्यांच्याकडून १० किलो वजनाचे, ९२ सेंटी मीटर लांबीचे जिवंत खवल्या मांजराची सुटका केली. या खवल्या मांजराची बाजार किम्मंत तब्बल ४० लाख रुपये आहे. वन्यजीव सरंक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४८ (ए), ४९ (ए), ५०, ५१ नुसार तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांनी न्यूज18 लोकमतला दिली.

 VIDEO भयंकर! भारतातल्या 'तितली'सह जगभरात ३ चक्रीवादळांचं असं सुरू आहे थैमान

First published: October 12, 2018, 7:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading