Home /News /mumbai /

नेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला, राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य

नेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला, राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य

kargil vijay diwas 2021 : 'अटलबिहारी वाजेपयी यांचा अपवाद वगळता आधीचं सरकार राष्ट्रीय सुरक्षेबद्दल गंभीर नव्हतं'

    मुंबई, 26 जुलै : 'देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (pandit jawaharlal nehru) यांच्याबद्दल मला आदर आहे. पण, त्यांच्या शांतीदूत प्रतिमीमुळे भारत देश कमकुवत झाला' असं वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( governor bhagat singh koshyari) यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे. कारगिल विजय दिनाच्या 22 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते कारगिल योद्ध्यांचा तसेच हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी हुतात्मा कॅप्टन विनायक गोरे (Captain Vinayak Gore) यांच्या वीरमाता अनुराधा गोरे लिखित ‘अशक्य ते शक्य’ कारगिल संघर्ष’ (Ashakya Te Shakya…Kargil Sangharsh) या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हजर होते. VIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि... यावेळी राज्यपाल म्हणाले की, 'अटलबिहारी वाजेपयी यांचा अपवाद वगळता आधीचं सरकार राष्ट्रीय सुरक्षेबद्दल गंभीर नव्हतं. पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत मला प्रचंड आदर आहे. पण त्यांचीही एक कमकुवत बाजू होती. ते शांतीदूत आहेत, असं त्यांना नेहमी वाटायचं. देशासाठी त्यांचं योगदान मोठं आहे. पण त्यांची शांतीदूत या प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला आणि हे बराच काळ पुढे सुरू होतं' असं वृत्त दैनिक लोकमतने दिले आहे. 'अटल बिहारी वाजपेयींच्या काळात देशात अणुचाचणी झाली. खरंतर हे तंत्रज्ञान आपल्याकडे 20 वर्षांपासून  होतं. पण आधीच्या सरकारने अणुचाचणी करण्याची हिंमत दाखवली नाही. अणुचाचणीमुळे भारतावर निर्बंध आले, पण वाजपेयी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यांनी आपली कणखर प्रतिमा जगाला दाखवून दिली' असंही कोश्यारी म्हणाले. Explainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून? वाचून ज्ञानात पडेल भर 'भारताला शांती हवी असली आहे. देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून देशाच्या सुदूर सीमावर्ती भागात चांगले रस्ते व सुसज्ज हवाई तळ उभारण्यात आले आहेत. १९६२ मध्ये आपण विद्यार्थीदशेत असल्यापासून आजपर्यंत देशाचे अनेक जवान व अधिकारी हुतात्मा झालेले पहिले, खुद्द आपल्या 22 वर्षीय बहिणीचे पती १९६२ च्या युद्धात शहिद झालं, असंही राज्यपालांनी सांगितलं. 'कारगिल युद्धात भारताची रणनीतीही जिंकली आणि कूटनीतीही जिंकली असे सांगून डोकलाम व गलवान या ठिकाणी चीनने नव्या भारताचे सामर्थ्यवान रूप पाहिले, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘अशक्य ते शक्य’ हे पुस्तक केवळ युद्धकथा नाही तर तो कारगिल युद्धाकडे पाहणारा समग्र ग्रंथ आहे, असं त्यांनी सांगितलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या