घरातून बाहेर पडताच भाजप आमदार राम कदम यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

घरातून बाहेर पडताच भाजप आमदार राम कदम यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पालघरमधील गडचिंचले साधू हत्यांकाड प्रकरणी राम कदम यांनी जन आक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर : भाजपचे (BJP) आमदार राम कदम (Ram Kadam) यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai) ताब्यात घेतले आहे. पालघर साधू हत्याकांड प्रकरणी राम कदम यांनी जन आक्रोश यात्रा  काढण्याच्या तयारीत होते. सकाळी कदम आपल्या निवास्थानातून बाहेर पडले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

पालघरमधील गडचिंचले साधू हत्यांकाड प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी राम कदम यांनी जन आक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं.  परंतु, पोलिसांनी त्यांच्या या यात्रेला परवानगी नाकारली होती. पण, यात्रा काढण्यावर कदम हे ठाम होते.

आज सकाळी राम कदम आपल्या निवास्थानापासून या यात्रेला सुरुवात करणार होते. पण, त्याआधी पोलिसांचा मोठा फौजफाटा हा कदम यांच्या निवास्थानाबाहेर जमा झाला होता. कदम आपल्या निवास्थानातून बाहेर पडताच खार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.  विना परवाना यात्रा काढण्याच्या तयारीत असताना राम कदम यांच्यासह त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, मागील महिन्यात 7 ऑक्टोबर रोजी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे साधूंच्या हत्याकांड प्रकरणी राज्य सरकारकडून नव्याने स्टेटस रिपोर्ट दाखल करण्यात आला. या रिपोर्टमध्ये राज्य सरकारने या प्रकरणात पोलिसांवर काय कारवाई केली याची माहिती दिली आहे.

काय आहे प्रकरण?

16 एप्रिल 2020 रोजी  कांदिवली येथील सुशीलगिरी महाराज, वाहन चालक निलेश तेलगडे आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे पुजारी कल्पवृक्षगिरी महाराज हे लॉकडाउनच्या काळात गुजरातकडे चालले होते.  चालकाची त्यांच्याकडे प्रवासाठीचा कोणताही पास नसल्याने त्यांना चारोटी टोलनाका येथून पोलिसांनी माघारी पाठवले. म्हणून ते माघारी फिरून आड मार्गाने विक्रमगडहून जव्हार-दाभाडीमार्गे दादरा नगर हवेलीच्या हद्दीवर असलेल्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास पोहचले.  मात्र, त्याठिकाणी वनविभागाच्या चौकीजवळ जमलेल्या एका जमावाने या तिघांची गाडी अडवली आणि चोर समजून दगड, कोयते, काठ्यांनी मारण्यास सुरूवात केली.

जमावानं त्यांची कारही पलटी केली. गार्डने प्रसंगावधान राखून पोलिसांना सूचना दिली. रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पोलीस आपल्या गाडीसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या तिघा जखमींना कारमध्ये बसवून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमाव शेकडोंच्या संख्येने असल्याने तिथं उपस्थित चार पोलिसांचे काहीच चालले नाही. जमाव अधिकच आक्रमक झाला आणि त्यांनी थेट पोलिसांवरही हल्ला चढवला. या घटनेतून पोलिसांनी कशीबशी आपली सुटका करून घेतली. मात्र, त्या तीन जणांची जमावाने दगड, काठ्या, कोयत्याने वार करुन निर्घृणपणे हत्या केली. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले होते.

Published by: sachin Salve
First published: November 18, 2020, 11:51 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading