Home /News /mumbai /

जखमी झाला म्हणून खेळाडूला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं, पण परत तो शुद्धीत आलाच नाही!

जखमी झाला म्हणून खेळाडूला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं, पण परत तो शुद्धीत आलाच नाही!

हाताला जखम झालेल्या खेळाडूला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

  विजय राऊत, पालघर, 2 फेब्रुवारी : कब्बडी खेळताना हाताला जखम झालेल्या खेळाडूला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र ऑपरेशननंतर तो परत शुद्धीतच आला नाही आणि त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. मिलिंद निकोले असं मृत तरुणाचं नाव आहे. पालघर मनोर येथील सह्याद्री हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. मिलिंद निकोले असं मृत तरुणाचं नाव असून शुक्रवारी कबड्डी खेळताना मिलिंदच्या हाताला फॅक्चर झालं होतं. त्यानंतर त्याला मनोरच्या सह्याद्री या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलं. फॅक्चर असल्यासाचं सांगत डॉक्टरांनी मिलिंद याच्या हाताचं ऑपरेशन करण्याचा सल्ला कुटुंबियांना दिला. दरम्यान शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मिलिंदला ऑपरेशन करण्यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. मात्र ऑपरेशन झाल्यानंतर मिलिंद पुन्हा शुद्धीवर आलाच नाही. त्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं. पोलिसांच्या छाप्यामुळे पंढरपूरमधील खासगी सावकारांमध्ये खळबळ; स्टॅम्प, कोरे चेक, कागदपत्रे जप्त मिलिंदच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मिलंदचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचं सांगत डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मिलिंदच्या कुटुंबीयांनी घेतली आहे. तर मिलिंदला वाचवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला, अशी माहिती संबंधित डॉक्टर्सकडून देण्यात आली आहे.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Akshay Shitole
  First published:

  Tags: Palghar

  पुढील बातम्या