पालघर, 13 एप्रिल : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील गॅलेक्सी सरफॅक्टटंट या कंपनीमध्ये आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला असून त्यामध्ये दोन कामगार दगावल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. औद्योगिक वसाहतीमधील अधिकांश उद्योग बंद असल्याने या स्फोटाचा आवाज दूर सुमारे पाच किलोमीटर लांबीवर असलेल्या नांदगाव व मुरबे गावांपर्यंत ऐकू आला.
घटनेची माहिती मिळताच तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले असून गंभीर जखमी व संभाव्य मृतांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. अचानक झालेल्या या स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. तर हा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचे कारण अद्याप समजलेले नाही.
Maharashtra: 2 people injured in a cylinder blast at a chemical factory in Tarapur MIDC, Palghar
मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर तारापूर इंडस्ट्रियलमध्ये लॉक डाउनच्या कालावधीत गॅलेक्सी कंपनीत हात धुण्यासाठी आणि सेनेटिझाइंग बनविणार्या कंपनीच्या बॉयलरमध्ये हा स्फोट झाला. ही कंपनी केवळ जिल्हाधिकाऱ्य़ांच्या आदेशाने कार्यरत होती. विजय पांडुरंग सावंत आणि समीर शहाबुद्दीन खोज अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत तर रुनल प्रभाकर राऊत असं जखमी झालेल्या कामगाराचं नाव आहे.