दहीहंडीला गालबोट, 2 गोविंदांचा मृत्यू

दहीहंडीला गालबोट, 2 गोविंदांचा मृत्यू

राज्यभरात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी झाली मात्र पालघर आणि नवी मुंबईत ऐरोलीमध्ये दोन गोविंदांचा मृत्यू झालाय.

  • Share this:

15 आॅगस्ट : राज्यभरात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी झाली मात्र पालघर आणि नवी मुंबईत ऐरोलीमध्ये दोन गोविंदांचा मृत्यू झालाय. पालघरमध्ये दहीहंडी फोडताना थरावरुन पडून गोविंदाचा मृत्यू झालाय. तर ऐरोली विजेच्या धक्क्याने एका गोविंदाचा मृत्यू झालाय.

पालघर येथील धनसार काशीपाडा येथील एक दहीहंडी फोडल्यानंतर रोहन गोपीनाथ किनी (21) याचा मृत्यू झाला. काशीपांडा येथील एक दहीहंडी फोडल्यानंतर रोहन खाली उतरल्यानंतर जमिनीवर कोसळला. याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या प्रकरणी पालघर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.  या प्रकरणी वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या संजय सिंग या पत्रकाराला रुग्णालयातील गावकरी आणि मित्रपरिवरतील जमावाने मारहाण केली.

तर, ऐरोली सेक्टर 5 मध्ये विजेच्या धक्क्याने एका गोविंदाचा जागीच मृत्यू झाला. जयेश तारले असं या गोविंदाचं नाव आहे. तो चुनाभट्टीतील एका गोविंदापथकासह ऐरोलीत दहीहंडी फोडण्यासाठी आला होता. सेक्टर 5 मध्ये पथकांची गर्दी झाली होती. तेव्हा गर्दीत उभा असलेल्या जयेश तारले हा तिथे असलेल्या एका प्रवेशद्वाराच्या लोखंडी कठड्यावर आदळला. शाॅर्ट सर्किटमुळे विद्युतप्रवाह प्रवाहित असल्याने जयेशला विजेचा जबर धक्का बसला. महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी रबाले पोलीस

स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

117 गोविंदा जखमी

दहीहंडी फोडण्यासाठी थरांवर थर लावणारे गोविंदा जखमी झाल्याची घटना घडलीये. संध्याकाळपर्यंत मुंबईतल्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या 117 गोविंदांची नोंद झाली. यातल्या 114  गोविंदांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलंय. तर दोन गोविंदांना अॅडमिट करण्यात आलंय. मुंबईतील या जखमी गोविंदांना मुंबईतील केईएम हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल आणि नायर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आलं होतं. 3 गोविंदा अजूनही अॅडमिट आहेत..तर जखमी गोविंदांच्या जखमा या किरकोळ असल्यानं त्यांना उपचारानंतर सोडून देण्यात आलंय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2017 09:17 PM IST

ताज्या बातम्या