कूलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा म्हणजे प्री प्लॅन मर्डर - राजनाथ सिंह

कूलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा म्हणजे प्री प्लॅन मर्डर - राजनाथ सिंह

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ या पुरस्कार सोहळ्यातील मुलाखतीत दिली.

  • Share this:

12 एप्रिल :  पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा म्हणजे पूर्वनियोजित खून आहे. पाकिस्तानच्या या कृत्याचा भारत निषेध करतो, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावलं आहे. त्याचबरोबर, कुलभूषण जाधवना सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं, सांगत त्यांना सोडवण्यासाठी आम्ही वाट्टेल ते करू, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल ‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ या पुरस्कार सोहळ्यातील मुलाखतीत दिली. यावेळी ते बोलत होते.

कुलभूषण जाधव रॉ एजंट नाही, त्यांची अटक चुकीची करण्यात आल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगीतलं. ते जर  रॉ एजंट असते तर त्यांच्याकडे भारताचा पासपोर्ट नसता, ही साधी गोष्ट आहे. पण पाकिस्तानला या वास्तवाशी देणंघेणं नाही. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण यांना सुनावलेली फाशीची शिक्षा म्हणजे पूर्वनियोजित खून असल्याचा आरोपही राजनाथ यांनी केला आहे.

पाकवर काय उपचार करायचा, ते काळ ठरवेल. कोणाचाही स्वभाव बदलण्यास वेळ लागतो. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानविरोधात आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवू, असं सांगत पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

दरम्यान, संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज कुलभूषण यांना सोडावण्यासाठी लोकसभेत ठराव मांडण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 12, 2017 10:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading