'उडता पंजाब' रिलीज होऊ न देण्यासाठी प्रचंड दबाव होता- पहलाज निहलानी

'उडता पंजाब' रिलीज होऊ न देण्यासाठी प्रचंड दबाव होता- पहलाज निहलानी

'उडता पंजाब' हा सिनेमा रिलीज न करण्यासाठी आणि सलमानचा 'बजरंगी भाईजान' ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होऊ नये यासाठी त्याकाळात मंत्रालयातून आपल्यावर प्रचंड दबाव टाकला गेला होता, असा गौप्यस्फोट पहलाज निलहानी यांनी केलाय.

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरून हटवल्यानंतर त्यांनी अखेर मौन सोडलंय. 'लेहरें' या यूट्यूब एन्टरटेन्मेंट चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केलेत. यात प्रामुख्याने आपल्याला पदावरून हटवण्यासाठी त्यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांना जबाबदार धरलंय. स्मृती यांनी आपल्याला 'इंदू सरकार' आहे तसा रिलीज करण्याचे निर्देश दिले होते मात्र आपण तसं केलं नाही. त्यामुळेच आपली उचलबांगडी झाल्याचं त्यांनी म्हंटलंय.

'उडता पंजाब' हा सिनेमा रिलीज न करण्यासाठी आणि सलमानचा 'बजरंगी भाईजान' ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होऊ नये यासाठी त्याकाळात मंत्रालयातून आपल्यावर प्रचंड दबाव टाकला गेला होता, असा गौप्यस्फोट पहलाज निलहानी यांनी केलाय. तसंच अनुराग कश्यपने त्याच्या सिनेमाला फायदा व्हावा यासाठी वाद उकरून काढल्याची टीकाही त्यांनी केलीय. बजरंगी भाईजानचे दिग्दर्शक कबीर खान यांच्यावरही त्यांनी टीका केलीय  'लिपस्टीक अंडर माय बुर्का'ला नियमानुसारच विरोध केला हेही त्यांनी स्पष्ट केलंय. पण मला पदावरून हटवण्यात एकता कपूर आणि स्मृती इराणी यांच्या मैत्रीचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

सेन्सॉर बोर्डात अनेक दलाल सक्रिय असून त्यांच्यामार्फत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचाही गंभीर आरोप निहलानी यांनी केलाय. पण या सर्व गोष्टी त्यांनी पदमुक्त झाल्यावरच का जाहीर केल्या त्यावर मात्र त्यांनी समाधानकारक स्पष्टीकरण दिलेलं नाही.

'लेहरें' या युट्यूब चॅनेलने पहलाज निहलानी यांची घेतलेली मुलाखत इथे पाहा...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2017 05:00 PM IST

ताज्या बातम्या