Home /News /mumbai /

नेमकं काय घडलं 'त्या' रात्री; का बुडालं बार्ज P305? मृत्यू पाहिलेल्या 'त्याने' सांगितला संपूर्ण थरार

नेमकं काय घडलं 'त्या' रात्री; का बुडालं बार्ज P305? मृत्यू पाहिलेल्या 'त्याने' सांगितला संपूर्ण थरार

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून जवळपास 170 किलोमीटर दूर असलेले बार्ज चक्रीवादळात भरकटले. या बार्जवर 707 कर्मचारी होते.

मुंबई, 20 मे: तौत्के चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) महाराष्ट्राला मोठा फटका बसला. या चक्रीवादळात मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून (Mumbai coast) खोल समुद्रात 175 किलोमीटर अंतरावर चार बार्ज भरकटले. चक्रीवादळात बार्जचे नांगर तुटल्याने ते भरकटले. या चारही बार्ज (barge)वर खलाशी आणि कर्मचारी मिळून असे एकूण 707 उपस्थित होते. या सर्वांच्या बचावासाठी नौदल (Indian Navy) आणि तटरक्षक दलाने तात्काळ हालचाली सुरू केल्या आणि युद्धनौका बचावकार्यासाठी तैनात केल्या. मात्र, त्या रात्री नेमकं काय घडलं? या प्रश्नाचं उत्तर त्या बार्जवर उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या भावाने सांगितलं आहे.
P-305 या बार्जवर उपस्थित असलेल्या 261 कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात होता. चक्रीवादळाच्या धोक्याच्या संदर्भात आधीच सूचना देऊनही इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. या दुर्घटनेत आतापर्यंत 49 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूस कंत्राटदार एफकॉन्स कंपनी आणि P-305 बार्जचा कॅप्टनच जबाबदार असल्याचं रेहमान शेख यांनी म्हटलं आहे. मुंबईच्या समुद्रात वादळ येणार माहित असून कॅप्टनने 261 जणांना अडवले, धक्कादायक माहितीसमोर बार्जवर चीफ इंजिनिअर असलेले रेहमान शेख यांना नौदलाच्या जवानांनी खोल समुद्रात जखमी अवस्थेत तरंगताना वाचवलं आणि सुखरूप मुंबईत आणलं. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेहमान शेख यांचे भाऊ आलम शेख हे सुद्धा दुसऱ्या बोटीवर इंजिनिअर आहेत. त्यांनी रेहमान शेख यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि बार्ज P-305 बुडण्याचं खरं वास्तव न्यूज 18 लोकमत समोर मांडलं. रेहमान शेख यांचे मोठे बंधू आलम शेख यांनी म्हटलं, यांच्याकडे हवामान विभागाचा अलर्ट होता, इशारा दिला असतानाही बार्ज तेथून परत का नाही आलं? यांना ओएनजीसीने का तेथे थांबवलं? आधीच सूचना देऊनही इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांना विनंती सुद्धा केली की परत फिरूया मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Cyclone, Indian navy, Mumbai

पुढील बातम्या