Home /News /mumbai /

P-305 बार्ज दुर्घटना प्रकरण: मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण, घ्यावी लागणार DNA टेस्टची मदत

P-305 बार्ज दुर्घटना प्रकरण: मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण, घ्यावी लागणार DNA टेस्टची मदत

तौत्के चक्रीवादळामध्ये (Cyclone Tauktae) समुद्र किनाऱ्यापासून 175 किमी अंतरावर P-305 बार्ज (P-305 Barge) बुडाले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची ओळख पटावी म्हणून त्यांच्या मृतदेहाची DNA टेस्ट होणार आहे.

    मुंबई, 22 मे : तौत्के चक्रीवादळामध्ये (Cyclone Tauktae) समुद्र किनाऱ्यापासून 175 किमी अंतरावर P-305 बार्ज (P-305 Barge) बुडाले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची ओळख पटावी म्हणून त्यांच्या मृतदेहाची DNA टेस्ट होणार आहे.  या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 61 झाली आहे. यापैकी 30 मृतदेहांची ओळख पटणे अवघड आहे. त्यामुळे त्यांची DNA टेस्ट करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. आतापर्यंत 28 कर्मचाऱ्यांच्या मृतदेहाची ओळख पटली असून ते त्यांच्या नातेवाईकाकडे देण्यात आले आहेत. कलिना फॉरेन्सिक लॅबच्या मदतीनं उर्वरित मृतदेहांचे 'डीएनए स्पॅल किट' तयार करण्यात येतील. त्यानंतर त्याची बेपत्ता कर्मचाऱ्याच्या घरातील व्यक्तींच्या डीएनएशी पडताळणी केली जाईल. बार्जच्या कॅप्टनविरुद्ध गुन्हा दाखल हे बार्ज बुडाल्याच्या प्रकरणात कॅप्टन राकेश बल्लव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्जवरील कर्मचारी मुस्तफिर रेहमान हुसेन शेख यांनी यलोगेट पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार दाखल केली आहे. चक्रीवादळाची सूचना असूनही कॅप्टन राकेश बल्लव यांनी बार्ज वेळीच न हलवता इतर कर्मचाऱ्यांच्या जीव धोक्यात घातला. या अपघातामधील कर्मचाऱ्यांच्या  मृत्यूस तसेच दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कॅप्टन बल्लव यांच्या विरोधात कलम 304 (2), कलम 338 आणि कलम 334 अन्वये सदोष मनुष्यवध तसेच बेजबाबदारपणे वैयक्तिक सुरक्षिततेस धोको पोहोचवणे, गंभीर दुखापतीला जबाबदार असणे आणि विशिष्ट हेतू न ठेवता हत्या करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. P-305 या बार्जवर एकूण 261 कर्मचारी होते. यापैकी 188 कर्मचाऱ्यांना नौदलाने वाचवले आहे. आयएनएस कोच्ची या युद्दनौकेच्या सहाय्याने या कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आले.ताशी 100 किमी वाऱ्याचा वेग असतानाही नौदलाने युद्धपातळीवर कार्य करुन या सर्वांचा जीव वाचवला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cyclone, Mumbai, Mumbai police

    पुढील बातम्या