मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Oxygen तुटवड्याचा फटका मुंबई मेट्रोला सुद्धा; मात्र प्लाझ्माने दिली संजीवनी

Oxygen तुटवड्याचा फटका मुंबई मेट्रोला सुद्धा; मात्र प्लाझ्माने दिली संजीवनी

Oxygen shortage hits Mumbai Metro: ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याने त्याचा फटका मुंबई मेट्रोला सुद्धा बसला आहे.

Oxygen shortage hits Mumbai Metro: ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याने त्याचा फटका मुंबई मेट्रोला सुद्धा बसला आहे.

Oxygen shortage hits Mumbai Metro: ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याने त्याचा फटका मुंबई मेट्रोला सुद्धा बसला आहे.

मुंबई, 28 मे: राज्यासह संपूर्ण देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान (Coronavirus 2nd wave) घातले. रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा अपुऱ्या पडत होत्या. राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तटवडा निर्माण झाला. ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen shortage) दूर करण्यासाठी इतर राज्यांतून ऑक्सिजन आणण्यात आला तसेच राज्य आणि केंद्राने सुद्धा ऑक्सिजनचा वापर केवळ वैद्यकीय कामासाठी करण्याचे निर्देश दिले. परिणामी इंडस्ट्रियल कामासाठी ऑक्सिजन पुरवठा ठप्प झाला. याचा परिणाम म्हणजे मुंबई मेट्रो (Mumbai Metro)च्या कामांवरही झाल्याचं पहायला मिळत आहे.

ऑक्सिजनचा उपयोग केवळ वैद्यकीय सेवेसाठी करण्याचे निर्देश मिळाल्याने औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा ठप्प झाला. यामुळे मुंबई मेट्रोच्या वेल्डिंग सारखी कामे रखडली. अखरे यावर पर्याय म्हणून मेट्रो प्रशासनाने प्लाझ्मा मशीनचा (Plasma machine) वापर केला आणि रखडलेली कामे पूर्ण करण्यास सुरूवात केली. मात्र, ऑक्सिजनच्या तुटवड्याअभावी मेट्रोच्या कामांना उशीर झाला हे निश्चित.

कोरोना बाधितांना प्लाझ्माची मदत मेट्रोला प्लाझ्मा मशीनची संजीवनी

कोरोना बाधित रुग्णांवर उपचाराासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर राज्यात होत असून त्यामुळे रुग्णांना मोठा फायदा होत आहे. या थेरपीचा वापर करुन अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे. तशाच प्रकारे ऑक्सिजनच्या तुटवड्यात मेट्रोला संजीवनी मिळाली ती प्लाझ्मा मशीनमुळे. प्लाझ्मा मशीनच्या सहाय्याने रखडलेली कामे मेट्रोने पूर्ण करण्यास सुरूवात केली आहे.

कोरोनामुळे कर्मचाऱ्यांची कमतरता

कोरोनामुळे परराज्यातील अनेक कर्मचारी हे आपल्या राज्यात परतले आहेत. तर राज्यातीलही काही कामगार आपल्या गावी गेल्याने कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे न्हावाशेवा-शिवडी म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) सागरी सेतू प्रकल्पाचे काम ठप्प झाले आहे.

31 मे रोजी चालकविरहीत मेट्रोचा ट्रायल रन

चालकविरहित मेट्रोचा ट्रायल रन 31 मे रोजी घेण्यात येणार आहे. यापूर्वी हा ट्रायल रन 31 मार्च रोजी होणार होता मात्र, कोरोनामुळे हा ट्रायल रन पुढे ढकलावा लागला आहे. आकुर्ली स्टेशनवर मुख्यमंत्री ट्रायल रनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

First published:
top videos

    Tags: Metro, Mumbai