मनसुख हिरेन त्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक नाहीत, महत्त्वाची माहिती आली समोर

मनसुख हिरेन त्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक नाहीत, महत्त्वाची माहिती आली समोर

स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी (Scorpio) प्रकरणी आता आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. सुरुवातीपासून सांगितलं जात होतं की ही गाडी ठाण्यातील कार डेकोरेटर व्यापारी मनसुख मिश्रालाल हिरेन (Mansukh Hiren Case) यांची आहे.

  • Share this:

मुंबई, 12 मार्च: स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी (Scorpio) प्रकरणी आता आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. सुरुवातीपासून सांगितलं जात होतं की ही गाडी ठाण्यातील कार डेकोरेटर व्यापारी मनसुख मिश्रालाल हिरेन (Mansukh Hiren Case) यांची आहे. पण पण या गाडीचे खरे मालक हिरेन नसून सॅम पीटर न्यूटन (Sam Peter Newton) नावाची एक व्यक्ती आहे असा खुलासा तपासात झालेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडीचे रजिस्ट्रेशन हे ठाणे आरटीओचे असून एप्रिल 2007 मध्ये हे रजिस्ट्रेशन सॅम पीटर न्यूटन या व्यक्तीच्या नावावर होते.  2016 मध्ये सॅम पीटर न्यूटन याने गाडीमध्ये सजावट करण्याच्या अनुषंगाने आहे ती गाडी मनसुख यांच्या क्लासिक डेकोरेटर याठिकाणी दिली होती. त्यांनी गाडीत जवळपास साडेतीन लाख रुपयांचे काम करून घेतले आणि 2 लाख 80 हजार रुपये न्यूटन हे मनसुख यांना देणार होते. मात्र काही कारणास्तव 2 लाख 80 हजार रुपयांची उर्वरित रक्कम मनसुख यांना देण्यास न्यूटन यांना जमले नाही.

(हे वाचा-BREAKING : सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली)

अशीही माहिती समोर येते आहे की, न्यूटन यांनी दिलेले दोन बँकेचे चेकही बाऊंस झाले यामुळे हिरेन आणि न्यूटन यांच्यात वाद देखील झाला होता. बऱ्याच वेळा संपर्क करून देखील न्यूटन यांनी पैसे न दिल्यामुळे हिरेन यांनी त्यांची तक्रार पोलिसात करण्याची धमकी दिली होती. साधारणपणे एप्रिल 2018 या दिवशी मनसुख हिरेन आणि सॅम पीटर न्यूटन यांची ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये भेट झाली होती.  यावेळी पैशांच्या देवाणघेवाणीवर दोघांमध्ये वादही झाले.

(हे वाचा-भयंकर! भरधाव ट्रकने महिलेला चिरडलं,चाक अंगावरुन गेल्याने अक्षरश: झाला चेंदामेंदा)

या दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की मनसुख यांनी सॅम यांना नौपाडा पोलीस ठाण्यात आणले आणि त्यांनी त्यांच्या एका पोलीस अधिकाऱ्यामार्फत सज्जड दमही भरला होता.पोलीस अधिकाऱ्याने सॅम यांना पैसे देण्याबाबत सुनावले होते. त्यानुसार सॅम पीटर न्यूटन याने पुढील पंधरा दिवसात आपण उर्वरित 2 लाख 80 हजार रुपये ही रक्कम मनसुख मिश्रालाल हिरण याला देऊ असं त्यावेळी सॅम यांनी पैसे देण्याचे कबूल देखील केले होते आणि तोपर्यंत आपली ही हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी हिरेन यांच्याकडे ठेवण्यास ते तयार झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार ती गाडी हिरेनच वापरत होते कारण सॅम यांनी त्यांचे पैसे अद्याप चुकवले नव्हते. हिरेन यांनी त्यांच्या जबाबात ही माहिती दिल्याचे समोर आले आहे. मुंबई क्राईम ब्रांचचे तत्कालीन अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांनी हा मनसुख हिरेन यांचा जबाब नोंदवला होता.

दरम्यान, एनआयएला (NIA) या प्रकरणात  मोठे यश मिळाले आहे. स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी पार्क करून पांढरा रंगांच्या इनोव्हा गाडीतून दोन संशयित फरार झाले होते. त्या इनोव्हा गाडी (Innova car) संदर्भात एनआयएच्या टीमच्या हाती  मोठी माहिती हाती लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडी बाबत मोठा खुलासा करणार असल्याचं सांगितलं जातं आहे

Published by: Janhavi Bhatkar
First published: March 12, 2021, 4:19 PM IST

ताज्या बातम्या