Home /News /mumbai /

वाळूच्या डंपरची रेल्वे गेटला धडक; दिवसाच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वेचा खोळंबा

वाळूच्या डंपरची रेल्वे गेटला धडक; दिवसाच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वेचा खोळंबा

सध्या या मार्गावरील रेल्वेसेवा अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. ऐन कामाच्या वेळी खोळंबा झाल्यानं प्रवशांकडूनही नाराजी व्यक्ती करण्यात येत आहे.

कल्याण,3 जानेवारी: वाळूच्या डंपरने रेल्वे गेटला धडक दिल्याने कसारा ते कल्याण दरम्यान अप-डाऊन वाहतुकीवर परिणाम झाला आहे. डंपरच्या धडक बसताच ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. या मार्गावरील वाहतूकही थांबवण्यात आली होती. त्यामुळे चाकरमान्यांना सकाळी-सकाळी मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, टिटवाळा-आंबिवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेचा खोळंबा झाला. मध्य रेल्वेने या घटनेची दखल घेत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले. ओव्हरहेड वायर दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वेसेवाही सुरू झाली आहे. मात्र, सध्या या मार्गावरील रेल्वेसेवा अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. ऐन कामाच्या वेळी खोळंबा झाल्यानं प्रवशांकडूनही नाराजी व्यक्ती करण्यात येत आहे. दुरूस्तीनंतर वाहतूकही सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. सध्या मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशीराने सुरू आहे. रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट शुक्रवारी (3 जानेवारी) सकाळी टिटवाळा ते अंबिवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली होती. कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसला. लोकल बंद असल्याने चाकरमान्यांना टिटवाळा ते कल्याण रिक्षाने प्रवास करावा लागला. काही रिक्षावाल्यांनी प्रति व्यक्ती 100 रुपये असा जास्तीचा दर आकारला. रिक्षाचालक नागरिकांच्या अडचणीचा गैरफायदा घेत असल्याची माहिती समोर आली आहे. रिक्षावाल्यांनी विनाकारण सामान्य नागरिकांना लुबाडु नका, अन्यथा वाहतूक पोलिसांकडे तक्रार करण्यात येईल असा, इशारा प्रवाशांनी दिला आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Indian railway, Kalyan, Maharashtra news, Marathi news, Mumbai local

पुढील बातम्या