13 आॅक्टोबर : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीये. ठाकुर्ली स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे अप लाईनची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
डोंबिवलीजवळ मध्य रेल्वेची वाहतूक ऐन संध्याकाळी विस्कळीत झाली. ठाकुर्ली स्टेशनजवळ ओव्हरहेड तुटल्यामुळे सीएसटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे ऐन संध्याकाळी घराकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहे. ओव्हरहेड वायर दुरस्तीचं काम युध्दपातळीवर सुरू आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा