मुंबईतील ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्यून उडी मारून तरुणाची आत्महत्या

मुंबईतील ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्यून उडी मारून तरुणाची आत्महत्या

मुंबईतील वांद्रे इथल्या ताज लँड्स एन्ड हॉटेलच्या 19व्या मजल्यावरून उडी घेत एका तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे.

  • Share this:

04 एप्रिल :   मुंबईतील वांद्रे इथल्या ताज लँड्स एन्ड हॉटेलच्या 19व्या मजल्यावरून उडी घेत एका तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. अर्जून भारद्वाज असं या तरुणाचं नाव आहे. धक्कादायकबाब म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ पोस्ट केला. त्यामध्ये त्याने आम्तहत्या कशी करावी याचे धडे दिले आहेत.

ताज हॉटेलमधील त्याच्या खोलीत पोलिसांना सुसाईड नोटही सापडली असून, त्यात त्याने ‘आपण ड्रग अडिक्ट असून, आपल्याला जगण्याचा कंटाळा आल्या'चं म्हटलं आहे. फक्त या कारणामुळेच आपण आत्महत्या करत असल्याचंही त्यानं स्पष्ट केलं आहे. हा तरूण मुंबईतील प्रसिद्ध एनएम कॉलेजचा विद्यार्थी होता. अर्जूनचे वडिल बंगळुरुतील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत.

या तरूणाच्या पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये त्याने खूप मोठ्या प्रमाणात ड्रग्जचं सेवन केल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला असून, या तरूणाच्या कुटूंबियांशीही पोलिसांनी संपर्क केल्याची माहिती आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ शेअर करून नये असे अवाहन पोलिसांनी केलं आहे.

First published: April 4, 2017, 1:08 PM IST

ताज्या बातम्या