मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'...अन्यथा एसटी कर्मचाऱ्यांचा उद्रेक होईल' राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

'...अन्यथा एसटी कर्मचाऱ्यांचा उद्रेक होईल' राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

'एसटी कर्मचारी जगला तर एसटी जगेल यांचे भान आपण ठेवाल आणि कारवाई न करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांना द्याल असे मला वाटते'

'एसटी कर्मचारी जगला तर एसटी जगेल यांचे भान आपण ठेवाल आणि कारवाई न करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांना द्याल असे मला वाटते'

'एसटी कर्मचारी जगला तर एसटी जगेल यांचे भान आपण ठेवाल आणि कारवाई न करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांना द्याल असे मला वाटते'

मुंबई, 04 नोव्हेंबर : ऐन दिवाळी सणाच्या दिवशीही एसटी बस कर्मचाऱ्यांचा ( ST bus workers strike) संप सुरूच आहे. राज्य सरकारने (mva government) काही अटी मान्य करूनही कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाही. आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांनी या वादात उडी घेतली आहे. राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांना पत्र लिहून एसटी कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करू नये, अशी विनंती केली आहे.

कोरोनातून बरे झाल्यानंतर राज ठाकरे आता पुन्हा एकदा मैदानात उतरल आहे. राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

एसटी राज्य शासनात विलीन करा या मागणीसाठी कर्मचारी आंदोलन करत आहेत. संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने नोटीस बजावली आहे. एसटी कर्मचारी जगला तर एसटी जगेल यांचे भान आपण ठेवाल आणि कारवाई न करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांना द्याल असे मला वाटते, अशी विनंती राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

तसंच, "एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी- कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल." असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.

Best 5G Smartphones : 20 हजारांहून कमी किंमतीत घेता येतील हे फोन, पाहा फीचर्स

कोरोनाच्या काळात जनसेवेची उत्तम कामगिरी करूनही तीसहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करून घ्या अशी प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. पण त्याचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. तसे ठोस आश्वासनही देण्यात आले नाही त्यामुळे अनेक कर्मचारी संपावर गेले आहे. अनेक आगारामध्ये काम ठप्प झाले आहे. अशा स्थितीत ऐन दिवाळीच्या दिवसांत कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती कारवाई करण्यात येईल अशा नोटिसा एसटी महामंडळाने बजावल्या आहे. दबावतंत्राचा वापर करून कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घेण्यात येत आहे, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.

First published: